जाहिरात

लेक, सुनेला त्रास नको म्हणून वृद्ध दाम्पत्याचा भयंकर निर्णय! आजोबांनी पत्नीचा गळा कापला अन्...

Vasai News: पती-पत्नी दोघेही दीर्घकाळापासून आजारी होते. दोघेही मानेची, कंबर, गुडघे दुखी सह इतर व्याधीने ग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. 

लेक, सुनेला त्रास नको म्हणून वृद्ध दाम्पत्याचा भयंकर निर्णय! आजोबांनी पत्नीचा गळा कापला अन्...

मनोज सातवी, वसई: सततचे आजारपण तसेच मुलगा आणि सुनेला त्रास नको म्हणून वृद्धाने आधी पत्नीची हत्या करुन स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना वसईमध्ये घडली आहे. 81 वर्षीय वृद्ध पतीने आधी स्वयंपाकघरातील चाकूने पत्नीचा गळा कापून ठार मारले. नंतर त्याच चाकूने स्वतःच्या मनगटाच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या भयंकर घटनेने वसईमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, वसईतील एका ८१ वर्षीय वृद्धाने स्वतःच्या ७४ वर्षीय पत्नीची चाकूने वार करून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःचाही जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही माहिती मीरा-भाईंदर-वसई-विरार (MBVV) पोलिसांनी दिली. पती-पत्नी दोघेही दीर्घकाळापासून आजारी होते. दोघेही मानेची, कंबर, गुडघे दुखी सह इतर व्याधीने ग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. 

Nashik News : 'तुला आम्ही रागावणार नाही'; वडिलांच्या 'त्या' वागण्याचा राग, मुलगा 12 दिवसांपासून बेपत्ता 

शनिवारी रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास गॅब्रियल परेरा (वय ८१) यांनी स्वयंपाकघरातील चाकूने पत्नी आर्टिना परेरा (वय ७४) यांच्यावर हल्ला करून ठार मारले. त्यानंतर त्यांनी त्याच चाकूने स्वतःच्या मनगटाच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत परेरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सध्या मृत्यूसोबत झुंज देत आहेत.

घटनेच्या वेळी दाम्पत्याचा मुलगा घराबाहेर गेला होता. परत आल्यानंतर घर आतून बंद असल्याने त्याने दरवाजा तोडला असता आई रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आणि वडील गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्याने तत्काळ पोलिसांना कळवले. वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी गॅब्रियल परेरा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. स्थानिक पोलिस पुढील तपास करत आहेत.

Akola News: अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय विसर्जनाला गेले, तीच संधी साधत घरामध्येच मोठा कांड

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com