जाहिरात
Story ProgressBack

उन्हाळ्यात सरबत पिणाऱ्यांनो व्हा सावध, पुण्यात बर्फामध्ये सापडला मृत उंदीर  

Pune News : बर्फाच्या लादीमध्ये मृत उंदीर आढळल्याचा किळसवाणा प्रकार पुण्यामध्ये घडला आहे.

Read Time: 2 min
उन्हाळ्यात सरबत पिणाऱ्यांनो व्हा सावध, पुण्यात बर्फामध्ये सापडला मृत उंदीर  

प्रतिक्षा पारखी/ पुणे (आळेफाटा) 

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या स्टॉलवरील सरबत पिण्याची किंवा बर्फाचा गोळा खाण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण पुण्यामध्ये बर्फाच्या लादीमध्ये मृत उंदीर सापडल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. बर्फाच्या लादीमध्ये मृत उंदीर असल्याचे माहिती असतानाही एका व्यायसायिकाने तोच बर्फ विकल्याची धक्कादायक घटना पुण्यातील (Pune News) बेल्हे येथे घडली आहे. जुन्नर तालुक्यातील (Junnar Taluka) बर्फाचे गोळे व सरबत विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या राजेश निषाद (Rajesh Nishad) यांनी हा संतापजनक प्रकार केला आहे. 


बाईक किंवा कारमधून प्रवास करताना करताना घशाला सतत कोरड पडत असते. यामुळे अनेक जण रस्त्याच्या कडेला लावलेल्या स्टॉलवरील अथवा हातगाडीवरील लिंबू पाणी, सरबत, उसाचा रस, फळांचा रस पितात. पण सरबतासाठी वापरलेले जाणारे पाणी, बर्फ कुठून आणले जाते? बर्फ ठेवण्याची जागा स्वच्छ असते का? सरबतासाठी साखरच वापरली जाते का? अशा आरोग्याच्या दृष्टीने कित्येक महत्त्वपूर्ण प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आपल्यापैकी बहुतांश जण डोळेबंद करून बर्फाचा गोळा खातात किंवा सरबत पितात.  
  
बफामध्ये आढळलेल्या मृत उंदराच्या (Dead Mouse) घटनेमुळे उसाचा रस, बर्फाचा गोळा, लिंबू सरबत प्यायल्यास लहान मुले व प्रवाशांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास यास जबाबदार कोण? बर्फ तयार केल्या जाणाऱ्या कारखान्यामध्ये होत असलेला हलगर्जीपणा आणि राजेश निषाद यांनी त्याच बर्फाची विक्री केल्यामुळे हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला.  

त्यामुळे रस्त्यावरील लिंबू पाणी, उसाचा रस पिताना तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे. कारण आरोग्यास अपायकारक असणाऱ्या पदार्थांचे सेवन केले गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान उघड्यावरील खाद्यपदार्थांमध्ये पाल, उंदीर सापडण्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. 

आणखी वाचा

विशाल पाटील सांगलीत मविआचा खेळ बिघडवणार? बंधू प्रतिक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला

ड्रग्ज विकणारी आजी अटकेत, साडेपाच लाखाचे ड्रग्ज जप्त

ग्राहक झालेत फिटनेस फ्रीक, नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये देशी-परदेशी फळांच्या मागणीत वाढ

छत्तीसगडमध्ये खोल दरीत बस कोसळून भीषण दुर्घटना, 12 जणांचा मृत्यू

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination