
पुणे: हिंजवडीमध्ये बुधवारी सकाळी धावत्या ट्रॅव्हल्स टेम्पोला आग लागल्याची मोठी दुर्घटना घडली होती. कंपनीच्या कामगारांना घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागून त्यामध्ये चौघांचा होरपुळून मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले होते. या भयंकर घटनेत आता मोठा ट्वीस्ट आला असून चालकानेच गाडी पेटवून चौघांचा जीव घेतल्याचे समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हिंजवडीमध्ये एका धावत्या मिनी बसने पेट घेतल्याची घटना घडली होती. या भयंकर दुर्घटनेत व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंजवडीमध्ये ती घटना अपघात नाही. तर चालकाने केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे.
कसा रचला भयंकर कट...
पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्या घटनेबाबत सविस्तर खुलासा केला असून चालक आरोपी गजानन हंबर्डीकर याने गुन्हा कबूल केल्याचे सांगितले आहे. आरोपीने त्याच कंपनीतून एक लिटर बेंझीन केमिकल आणले होते. हे केमिकल त्याने स्वतःच्या ड्रायव्हिंग सिटच्या खाली ठेवले. त्याचबरोबर कंपनीत वापरल्या जाणाऱ्या कापडाच्या चिंध्या आणि आगपेटीही त्याने सोबत ठेवली होती. फेज 1 मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला. गाडीला आग लागण्याच्या आधीच त्याने चलाखीने गाडीतून उडी घेतली.
नक्की वाचा - Hinjewadi Bus Fire : पुण्यातील हिंजवडीत बसला भीषण आग; 8 जण बचावले..., 4 प्रवासी जळून खाक!
आरोपी काय म्हणाला?
"मी गाडीचा ड्रायव्हर असून मला मजुरासारखी वागणूक देत होते. दुपारी जेवायला जाताना मला काम सांगायचे. माझा दिवाळीचा बोनसही कापण्यात आला होता. परवाही मला जेवणाचा डबा खायला वेळ दिला नाही. माझे बसमधील तिघांशी वाद होते, त्याच रागातून मी हा प्रकार केल्याची कबुली जनार्दन हंबार्डेकर याने पोलिसांजवळ दिली.
तसेच मला एवढा भयंकर कांड करायचा नव्हता. आग इतक्या मोठ्या प्रमाणात लागेल असे मला वाटलेही नव्हते मात्र मोठ्या प्रमाणात भडका झाल्याने गाडी पेटली. यामध्ये चूक नसलेल्या चौघांचा जीव गेला असेही जनार्दनने पोलिसांना सांगितले. त्याला आपल्या कृत्याचा मनस्ताप होत असल्याचेही तो म्हणाला.
Chitra Wagh News: 'तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते', चित्रा वाघ कुणावर संतापल्या? पाहा VIDEO
दरम्यान, या बस अपघातात सुभाष भोसले, शंकर शिंदे, गुरुदास लोकरे आणि राजू चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. तर प्रदीप बाबुराव राऊत, विकास गोडसे, मंजिरी अडकर, नंदकुमार सावंत, विठ्ठल दिघे, विश्वास लक्ष्मण खानविलकर हे जखमी झाले आहेत. या कर्मचाऱ्यांवर हिंजवडी येथील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world