रेवती हिंगवे, प्रतिनिधी:
Pune Jain Boarding Deal Controversy: पुणे शहरातील 'जैन बोर्डिंग हाऊस'च्या (Jain Boarding House) जमीन विक्री प्रकरणावरून (Land Sale Row) सुरू असलेल्या वादामध्ये आता सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादानंतर अखेर गोखले बिल्डर (Gokhale Builder) यांनी हा व्यवहार रद्द (Deal Cancelled) करत असल्याचे जाहीर केले आहे.
जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होणार..
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी या घडामोडीची माहिती दिली आहे. शेट्टी म्हणाले की, "गोखले बिल्डर यांनी जैन बोर्डिंग संस्थेला एक पत्र मेल केले आहे, ज्यात हा व्यवहार आम्ही रद्द करत असल्याचे नमूद आहे. याच संदर्भात काल (शनिवारी) रात्री साडे दहा वाजता मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांचा फोन आला होता." या व्यवहार रद्द करण्याच्या पत्रात बिल्डरने जैन बोर्डिंग संस्थेकडे २३० कोटी रुपये परत (Return ₹230 Crore) करण्याची मागणी केली आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले.
बिल्डरने हे पाऊल टाकल्याबद्दल राजू शेट्टी यांनी समाधान व्यक्त केले असले तरी, त्यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली आहे. बिल्डरने माघार घेतल्याचे आम्ही स्वागत करतो, मात्र आम्ही केवळ यामुळे समाधानी नाही. ट्रस्टींनी (Trustees) स्वतः समोर यायला पाहिजे आणि हा पूर्ण व्यवहार (Entire Transaction) रद्द केला पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली आहे. जोपर्यंत हा व्यवहार कायदेशीररित्या पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन (Protest) थांबणार नाही, असा जोरदार इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
राजू शेट्टींची बैठक
रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेते नेते राजू शेट्टी यांनी ८६ हून अधिक जैन संस्था, संघटनांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीत त्यांनी जैन बोर्डिंग वसतिगृहाची (Hostel) जागा विकण्याचा ट्रस्टींचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. ट्रस्टींनी हा व्यवहार रद्द करावा आणि खरेदी करणाऱ्या गोखले बिल्डरला विनंती करावी, असा ठराव बैठकीत करण्यात आला होता.
या विनंतीनुसारच गोखले बिल्डर यांनी व्यवहार रद्द करण्याचा मेल केला आहे, मात्र आता ट्रस्टींनी तातडीने भूमिका स्पष्ट करून व्यवहार पूर्णपणे रद्द करावा आणि गोखले बिल्डर यांचे पैसे परत करावेत, अशी मागणी राजू शेट्टी यांनी लावून धरली आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते, तसेच आजपासून त्यांनी उपोषणाचा इशाराही दिला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world