Pune Koregaon Park Land Scam Update: पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमिन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गैरप्रकार केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. कोरेगाव पार्कमधील ही ४० एकर जमिन जिची बाजारभावानुसार किंमत १८०० कोटी आहे ती फक्त ३०० कोटींना विकत घेण्यात आली. इतकेच नव्हेतर या व्यवहारासाठी लागणारी २१ कोटींची स्पॅट ड्युटीही माफ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आता सर्वात मोठा खुलासा झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, १९६२ साली महार वतनाकडून ही जमीन सरकार दरबारी जमा झाली. केंद्र सरकारच्या बॉटनिकल सव्र्व्हे ऑफ इंडियाला जमीन ५० वर्षांच्या भाडेकराराने दिल्याची माहिती आहे. दुसरीकडे सरकारी उताऱ्यावर दुसऱ्या कॉलमात मूळ महार वतनदारांचीही नावे आहेत. स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड तयार झाले तेव्हा वेगवेगळे उतारे निघाले. त्याचा फायदा घेत शीतल तजवाणी नामक व्यक्तीच्या पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि सरकारने करार केला. तजवाणींनी महार वतनाकडून फक्त १० ते १५ हजारांमध्ये पॉवर ऑफ अॅटर्नी घेतली.
Matheran Mini Train: माथेरानची राणी पुन्हा धावणार! मिनी ट्रेन सेवा सुरु, कसे असेल वेळापत्रक? वाचा...
मग तजवाणी आणि पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीत जमिनीचा व्यवहार झाला. कागदपत्रांवर शासनाच्या नावे ही जागा आहे. दरम्यान, या प्रकरणी आता दिग्विजय पाटील, शितल तेजवानी आणि रवींद्र तारू या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे, मात्र त्यामध्ये पार्थ पवार यांचे नाव मात्र नाही. पार्थ पवार यांचे गुन्ह्यामधून नाव वगळल्यानंतर अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
माझा याच्याशी काहीही संबंध नाही असं अजित दादा कसं म्हणू शकतात. मुलगा पुण्यात 300 कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही, हे पटतंय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच 1% ज्यांचे शेअर आहे त्या पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो मात्र 99% यांचे शेअर आहेत त्या पार्थ पवारवर गुन्हा दाखल होत नाही? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
(नक्की वाचा- Beed News: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट; बड्या राजकीय नेत्याचं कनेक्शन उघड)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world