जाहिरात

Maval News: 8 वर्षांपूर्वी मालकाचा एन्काऊंटर, घोडा आजही घालतोय कोर्टाच्या येरझाऱ्या; 'मावळ' हादरवणारं प्रकरण काय?

हत्येला जवळपास आठ वर्ष उलटून गेले मात्र एका घोड्यामुळे प्रकरण आजही चर्चेत आहे. काय आहे या घोड्याची आणि श्माम दाभाडेच्या एन्काऊंटरचे कनेक्शन? वाचा सविस्तर.. 

Maval News: 8 वर्षांपूर्वी मालकाचा एन्काऊंटर, घोडा आजही घालतोय कोर्टाच्या येरझाऱ्या; 'मावळ' हादरवणारं प्रकरण काय?

अविनाश पवार, पुणे: 2016 मध्ये पुणे ग्रामीण स्थानिक शाखेच्या पोलीस चकमकीत मावळातील कुख्यात गुंड श्याम दाभाडे आणि त्याचा साथीदार धनंजय शिंदे ठार झाला होता. तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्या हत्या प्रकरणात श्याम दाभाडेचा एन्काऊंटर करण्यात आला. या हत्येला जवळपास आठ वर्ष उलटून गेले मात्र एका घोड्यामुळे प्रकरण आजही चर्चेत आहे. काय आहे या घोड्याची आणि श्माम दाभाडेच्या एन्काऊंटरचे कनेक्शन? वाचा सविस्तर.. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

2016 मध्ये  साली मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे श्याम दाभाडे ह्या कुख्यात गुन्हेगाराचा झालेला एन्काऊंटर हा त्यावेळी चांगला चर्चेत आला होता. श्याम दाभाडे याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते यामध्ये श्याम दाभाडे याच्याशी पोलिसांची चकमक  झाली त्या एन्काऊंटरमध्ये तो मृत पावला. मात्र त्यावेळी तो ज्या घोड्यावरून रपेट मारत होता त्या घोड्याला देखील पोलिसांनी आरोपी केलं आणि ताब्यात घेतले.

हा घोडा सध्या मावळ तालुक्यातील धामणे येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज गोशाळेमध्ये संगोपनासाठी ठेवलेला आहे.या गोशाळेचे चालक रुपेश गराडे यांनी गेली सात वर्ष या घोड्याचे संगोपन केले आहे सध्या त्यांना या कोर्ट केस संदर्भात या घोड्याला ज्यावेळी तारीख असेल त्यावेळी त्यांना कोर्टात देखील हजर करावा लागतो.

ट्रेंडिंग बातमी - Crime news: रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवले, 17 जणांकडून 1 कोटी उकळले, शिंदेंच्या शहराध्यक्षाने हे काय केले?

एकूणच ह्या घोडीचा सध्या तरी आरोपी म्हणून या गोशाळेमध्ये सांभाळ करण्यात येत आहे. या गोशाळेकडून गेली सात वर्षे ते संगोपनाचा खर्च करत आहेत. आता या केसचा निकाल लागेल तेव्हाच या घोडीचा सोक्षमोक्ष लागेल मात्र तूर्त तरी या घोडीचा सांभाळ हा मावळ तालुक्यातील या संत तुकाराम महाराज गोशाळेला करावा लागत आहे. पिल्लू असं या घोडीचे नाव असून गेल्या आठ वर्षांपासून  रुपेश गराडे हे तिचे संगोपन करत आहेत. या घोडीचा दिवसाचा खर्च हा 1000 ते 1500 रुपये आहे. कोर्ट आदेश देईपर्यंत आम्ही या घोडीचे संगोपण करणार असल्याचे रुपेश गराडेंनी सांगितले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: