
Pune MSRTC Bus Poor Condition: राज्यात एकीकडे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी त्यांच्या शासकीय निवासस्थानांच्या नूतनीकरणावर (Renovation) लाखो रुपये खर्च करत असताना,दुसरीकडे सरकार जाहिरातींवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत असताना, ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली 'लालपरी' (MSRTC Bus) मात्र अत्यंत दयनीय अवस्थेत धावत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. पुण्यातील ओतूर–नारायणगाव मार्गावर धावणाऱ्या एका एसटी बसला चक्क दरवाजाच (Door) नाही, तरीही प्रवाशांचा जीव धोक्यात घालून ही बस वाहतूक करत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एसटी बसच्या दुरावस्थेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये, एसटीचालक बस चालवत असताना त्याच्या बाजूचा, म्हणजेच बसचा मुख्य दरवाजा पूर्णपणे निखळलेला (Detached) दिसत आहे. यामुळे चालक आणि बाजूला बसलेल्या प्रवाशाचा जीव अक्षरशः धोक्यात येत आहे.
Railway Ticket Booking: पोस्ट ऑफिसमधून बूक करता येणार तिकिट; महाराष्ट्रात कुठे-कुठे सुविध उपलब्ध
हे दृश्य शासनाच्या निष्काळजीपणाचे (Negligence) आणि सामान्य जनतेच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे असलेल्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण आहे. ही बस नारायणगाव डेपोची असल्याची माहिती मिळाली आहे. अनेक प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर एसटीच्या दुरावस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रवासादरम्यान जीव धोक्यात घालावा लागतो, अशी प्रवाशांची तक्रार आहे.
कुठे नेऊन ठेवलाय लालपरीचा दरवाजा? मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री साहेब जनतेचा जीव एवढा स्वस्त आहे का?#MSRTC #Pune #लालपरी pic.twitter.com/OKRkosD5kG
— Gangappa Pujari (@GangappaPujar07) October 17, 2025
काही दिवसांपूर्वीच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या महागड्या टेस्ला कारची जोरदार चर्चा झाली होती. एकीकडे परिहन मंत्री कोट्यवधी रुपयांच्या कारमधून फिरत असतानाच सामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचे साधन असलेल्या एसटी बसकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. ग्रामीम भागाची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लालपरी अशा दयनीय अवस्थेत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
नक्की वाचा- Gold Price: 1 किलो सोन्यात खरेदी करता येईल 9 कोटींची रोल्स रॉयस कार; हर्ष गोएंका यांची पोस्ट चर्चेत
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world