
दिवाळीसारख्या सणांच्या काळात ट्रेन तिकिटांसाठी धावपळ करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता ट्रेनचे तिकीट बुक करण्यासाठी लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही किंवा स्टेशनपर्यंत जाण्याचीही गरज नाही. भारतीय डाक विभागाने रेल्वे मंत्रालयासोबत मिळून एक नवीन सुविधा सुरू केली आहे, ज्या अंतर्गत आता लोक आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधूनच ट्रेनची तिकिटे बुक करू शकतील.
गाव, खेडी आणि दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या लोकांनाही तिकीट बुकिंगची सुविधा सहज उपलब्ध व्हावी. याशिवाय जिथे रेल्वे स्टेशन नाही किंवा आरक्षण काउंटर नाही अशा नागरिकांना तिकिटे बुक करता यावीत यासाठी ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. नवीन व्यवस्था सणांच्या काळात प्रवाशांची गर्दी हाताळण्यासाठी आणि ग्रामीण भागातील प्रवासाला सोयीस्कर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानलं जात आहे.
भारतीय डाक विभागाने रेल्वे मंत्रालयासोबत मिळून देशभरातील 333 पोस्ट ऑफिसमध्ये तिकीट बुकिंग सेवा सुरू केली आहे. यापैकी बहुतेक पोस्ट ऑफिस ग्रामीण आणि निम-शहरी भागांमध्ये स्थित आहेत. जेणेकरून दुर्गम भागातील लोकांनाही ही सुविधा सहज मिळू शकेल. या पोस्ट ऑफिसमध्ये पीआरएस टर्मिनल (PRS Terminal) बसवण्यात आले आहेत, ज्याच्या माध्यमातून रेल्वेची तिकिटे बुक केली जात आहेत. या नवीन व्यवस्थेअंतर्गत प्रवासी सर्व क्लासची तिकिटे, जसे की स्लीपर, एसी, जनरल इत्यादी बुक करू शकतात.
(नक्की वाचा- Gold Price: 1 किलो सोन्यात खरेदी करता येईल 9 कोटींची रोल्स रॉयस कार; हर्ष गोएंका यांची पोस्ट चर्चेत)
पोस्ट ऑफिसमधून ट्रेनचे तिकीट कसे बुक कराल?
- तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा जिथे पीआरएस काउंटर बसवले आहे.
- तुमच्या प्रवासाची माहिती, स्टेशनचे नाव, तारीख, ट्रेनचे नाव किंवा नंबर आणि क्लास सांगा.
- फॉर्म भरा आणि पैसे भरा.
- पोस्ट ऑफिस कर्मचारी तुमचे बुकिंग सिस्टममध्ये एंटर करेल आणि तुम्हाला लगेच तिकीट मिळेल.
- या सेवेद्वारे, स्लीपर, एसी आणि जनरल अशा सर्व वर्गांची तिकिटे बुक करता येतील.
प्रवाशांनी सर्वप्रथम हे जाणून घ्यावे की तुमच्या परिसरातील कोणते पोस्ट ऑफिस पीआरएसशी जोडलेले आहे, कारण ही सुविधा निवडक पोस्ट ऑफिसमध्येच उपलब्ध आहे.
कुणाल होईल फायदा?
प्रवाशांना तिकीट बुक करण्यासाठी कोणत्याही ट्रॅव्हल एजंटकडे किंवा स्टेशनवर जाण्याची गरज नाही. ते आपल्याच परिसरातील पोस्ट ऑफिसमधून सहज ट्रेनचे तिकीट बुक करू शकतील. ही सुविधा अशा लोकांसाठीही दिलासादायक आहे, जे डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास सोयीस्कर नाहीत, जसे की ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती. आता तेही कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून प्रवासासाठी तिकीट मिळवू शकतील.
(नक्की वाचा- Who Is Viral Ravi Sharma: लाखो-करोडोंच्या बाता मारणारा रवी शर्मा आहे तरी कोण? तुम्हीही VIDEO)
महाराष्ट्रात कुठे-कुठे उपलब्ध?
- मुंबई (जीपीओ)
- दादर (एचओ)
- मांडवी (पीओ)
- चिंचबंदर (पीओ)
- अँटॉप हिल (पीओ)
- मलबार हिल (पीओ)
- गिरगाव (एमडीजी)
- सायन (पीओ)
- चेंबूर (पीओ)
- पवई आयआयटी (पीओ)
- कुर्ला उत्तर (पीओ)
- टागोर नगर (पीओ)
- जे जे हॉस्पिटल (पीओ)
- दहिसर (पीओ)
- मालेगाव (एचओ)
- त्र्यंबक (एसओ)
- नेरूल नोड 3
- अलिबाग (एचओ)
- महाड (एसओ)
- जालना (आरएस)
- हायकोर्ट बिल्डिंग (पीओ)
- कन्नड
- आंबेजोगाई
- अक्कलकुआ (एसओ)
- हडगाव
- शिवाजीनगर (एसओ)
- तुळजापूर (एसओ)
- इचलकरंजी
- सावंतवाडी
- सिंधुदुर्गनगरी
- मालवण
- रत्नागिरी (एचओ)
- लांजा
- संगमेश्वर
- खेड
- अयोध्यानगर (पीओ)
- शंकर नगर (पीओ)
- भंडारा (एचओ)
- गडचिरोली (एमडीजी)
- देवळी (एसओ)
- कारंजा (एसओ)
- अर्णी (एसओ)
- आष्टी (एसओ)
- आर्वी (एसओ)
- श्री प्रतागधाम (एसओ)
- बार्शी (पीओ)
- गुरुनानक नगर (एसओ)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world