
रेवती हिंगवे, पुणे: गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या भयंकर बातम्या समोर येत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाल्याचे, चिमुकल्या मुलांचे लचके तोडल्याचे व्हिडिओही समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली असून पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात एका चिमुकल्यावर हल्ला करत त्याचा जबडाच फाडल्याची भयंकर घटना घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील शिवाजीनगर, मॅाडेल कॅालनी परिसरात एका सोसायटीत सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या शेर बहादूर बिस्ता यांच्या अवघा ७ वर्षाच्या मुलाचा कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नरेंद्र बिस्ता असे या चिमुकल्या मुलाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
चिमुकला नरेंद्र आपल्या बालमित्रासोबत मॅाडेल कॅालनीतील महापालिकेच्या चित्तरंजन वाटिका उद्यानात खेळण्यासाठी गेला होता उद्यानात आलेल्या भटक्या कुत्र्याच्या डोक्यावरून तो हात फिरवत असताना कुत्र्याने त्याच्यावर हल्ला करून, गालाला चावा घेतला. आणि त्या चिमुकल्याला 15 ते 20 फरफटत नेले. नरेंद्रच्या मित्राने कुत्र्याला दगड मारल्याने सुदैवाने त्याची सुटका झाली मात्र, कुत्र्याने मुलाचा जबडा फाडल्याने मोठी जखम झाली आहे.
(नक्की वाचा- Pehalgam Terror Attack: 'PM मोदी निवृत्तीच्या उंबरठ्यावर, जाता जाता पाकचे 4 तुकडे...' 'सामना'चा लक्षवेधी अग्रलेख!)
या हल्ल्याआधीचा एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून त्यामध्ये कुत्रा पार्कमध्ये मोकाट फिरत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, या भयंकर घटनेने भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेने परिसरातही भितीचे वातावरण पसरले आहे.
(नक्की वाचा- Phule Movie 'मी स्वतः ब्राह्मण, माझ्याएवढा स्ट्राँग...' फुले चित्रपटावर दिग्दर्शकाचा मोठा खुलासा)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world