जाहिरात

Alandi News: आळंदी देवस्थानचा ऐतिहासिक निर्णय! विश्वस्तपदाची सूत्रे पहिल्यांदाच महिलेच्या हाती, कोणाची लागली वर्णी?

या निवडीनंतर रोहिणी पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून आळंदी देवस्थानच्या पहिल्या महिला विश्वस्त होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.

Alandi News: आळंदी देवस्थानचा ऐतिहासिक निर्णय! विश्वस्तपदाची सूत्रे पहिल्यांदाच महिलेच्या हाती, कोणाची लागली वर्णी?

सुरज कसबे, आळंदी: संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी प्रथमच एका महिलेची निवड करण्यात आली आहे. ॲड. रोहिणी पवार यांनी पहिल्या महिला विश्वस्त होण्याचा मान मिळवत इतिहास रचला आहे. या निवडीनंतर रोहिणी पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून आळंदी देवस्थानच्या पहिल्या महिला विश्वस्त होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या विश्वस्त मंडळावर प्रथमच एका महिलेची नियुक्ती करत नवा इतिहास रचला गेलाय. पुण्याच्या प्रसिद्ध विधीतज्ञ रोहिणी पवार यांना देवस्थानच्या पहिल्या महिला विश्वस्त होण्याच्या मान मिळाला आहे. या सोबतच  ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील आणि ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर-लोंढे यांची विश्वस्तपदी निवड झाली आहे.  

गेल्या दीड वर्षापासून रिक्त असलेल्या तीन विश्वस्तपदांच्या जागा भरण्याची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली असून, या नियुक्तीमुळे आळंदीच्या धार्मिक आणि प्रशासकीय व्यवस्थापनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. नवीन विश्वस्तांच्या नियुक्तीमुळे समानतेचा संदेश देताना स्थानिक आळंदीकरांचाही प्रतिनिधित्वाचा आग्रह पूर्ण झाला आहे.

ट्रेंडिग बातमी - Pahalgam attack: भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर जगाचा पाठिंबा कुणाला? अमेरिका, रशिया, चीन कुणाच्या बाजूनं?

दरम्यान, चैतन्य महाराज आणि बिग बॉस मराठी फेम पुरूषोत्तम महाराज आळंदीकर नागरिक आहेत. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे दोन दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने देवस्थान कमिटीमध्ये महिला विश्वस्त निवडीसंदर्भातील रिट याचिका फेटाळली होती.