जाहिरात

Pune News : डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या रात्रभर रांगा, कुठे हाणामारी; सर्वांमध्ये पुण्याचा पंपचालक ठरला खरा हिरो

अनेक भागात डिझेलसाठी मारहाणीच्या घटना घडल्याचंही पाहायला मिळत आहे. असं असताना पुण्यातील राजगड तालुक्यात मात्र दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. 

Pune News : डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या रात्रभर रांगा, कुठे हाणामारी; सर्वांमध्ये पुण्याचा पंपचालक ठरला खरा हिरो

अजिंक्य पाटील, प्रतिनिधी

Pune News : राज्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. पेट्रोल पंपावर डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या दिवस रात्र रांगा लागल्याच पाहायला मिळत आहे. अनेक भागात डिझेलसाठी मारहाणीच्या घटना घडल्याचंही पाहायला मिळत आहे. असं असताना पुण्यातील राजगड तालुक्यात मात्र दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. 

शेतकऱ्यांच्या दारात डिझेल पोहोचवलं...

पेट्रोल पंपावरील वाढत्या गर्दीमुळे पंप चालक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी मारहाणीच्याही घटना घडल्या असल्याने पंप चालकांकडून नवनव्या क्लृप्ता शोधल्या जात आहेत. एका पेट्रोल पंप चालकाने ग्राहकांना नंबरची चिठ्ठी देणं सुरू केलं, ज्यामुळे पंपावरील गर्दीवर नियंत्रण आणणं शक्य झालं. दरम्यान पुण्यातील राजगड तालुक्यातून आणखी एक दिलासादायक चित्र समोर आलं आहे. मोबाईल डिस्पेंसर म्हणजेच फिरत्या पेट्रोल पंप द्वारे थेट शेतकऱ्यांना त्यांच्या दारात डिझेल पोहोचवलं जात आहे. अनेक ठिकाणी शेतकरी पेट्रोल पंपावर रात्रभर सांग लावून उभे आहेत. मात्र येथे तर थेट शेतकऱ्यांच्या दारात डिझेल पोहोचवलं जात आहे. इंडियन ऑइल कंपनीच्या फ्युएल कॉल सुविधेद्वारे शेतकऱ्यांना घरपोच डिझेल उपलब्ध करून दिलं जात असल्याची माहिती आहे. 

नक्की वाचा - फुलांचा हार अन् पिशवीच्या आडून लाखोंची चोरी; माऊलींच्या दानपेटी चोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

नंदुरबारमधील नागरिक पेट्रोल भरण्यासाठी गुजरातला...

नंदुरबार जिल्ह्यात आज पेट्रोल 112 रुपये प्रति लिटर प्रमाणे विक्री होत आहे. तर दुसरीकडे जवळील असलेले गुजरात राज्यात पेट्रोल 103 रुपये प्रति लिटर प्रमाणे विक्री होत आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन शेजारी राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरात तब्बल दहा रुपयांपर्यंतचा फरक पाहायला मिळत आहे. गुजरात राज्यात पेट्रोल स्वस्त असल्याने सीमा वरती भागात राहणारे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक, वाहनचालक गुजरातमध्ये जाऊन इंधन भरताना दिसत आहेत. राज्य सरकारच्या कररचनेमुळे हा फरक निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. वाढत्या महागाईत महाराष्ट्रातील वाहनधारकांना आर्थिक फटका बसत असून गुजरात राज्याप्रमाणेच महाराष्ट्र राज्यात राज्य शासनाने पेट्रोलवरील कर कमी करावे आणि राज्यातील जनतेला काही दिलासा द्यावे अशी मागणी आता वाहनधारकांकडून केली जात आहे.

अधिक दर अन् पुरवठाही विस्कळी...

एकीकडे महाराष्ट्र राज्यातील जनता इंधन तुटवड्यामुळे हतबल झाली आहे. तासनतास रांगेत उभं राहून नागरिकांना पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावं लागत आहे. तर जवळच असलेल्या गुजरात राज्यात परिस्थिती वेगळी आणि समाधानकारक असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या अतिरिक्त करामुळे महाराष्ट्र राज्यातील जनतेला एक लिटर पेट्रोलवर दहा रुपये अधिकचे मोजावे लागत आहे. तर अधिक दर असला तरी देखील पुरवठा सुरळीत होत नसल्याने जनतेला अधिकच्या दर आणि इंधन तुटवडा या दोन्ही समस्यांच्या सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र सरकारने देखील गुजरात सरकार प्रमाणे आपले कर कमी करून नागरिकांना काहीसा दिलासा द्यावे अशीच अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com