
रेवती हिंगवे, पुणे: विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर सध्या नको त्या कारणांनीच चर्चेत आहे. शहरात गुन्हेगारी, अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच आता पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिकणाऱ्या मुलींकडून मोठ्या प्रमाणात मद्यपान आणि धुम्रपान केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या वर्षभरापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे वेगवेगळ्या नकारात्मक गोष्टींसाठी चर्चेत आहे. मुलांच्या वसतिगृहात गांजा सापडणे, विद्यापीठ परिसरात अवैध रित्या तंबाखू विक्री होणे, इ. अनेक घटना सातत्याने घडत आहेत. आता पुन्हा एकदा असाच एक गंभीर प्रकार समोर आला असून विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात मोठ्या प्रमाणात मद्य प्राशन होत असल्याचे उघडकीस आले आहे.

वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थीनीने या सर्व गैरप्रकारची माहिती वसतीगृह महिला अधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर संबंधित विद्यार्थीनी प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्र लिहून हा सर्व घटनाक्रम सांगितला आहे. सगळ्यात महत्त्वाचे मुलींच्या वसतिगृह गेटवर बायोमेट्रिक उपकरणे आहेत. असे असताना येवढ्या मोठ्या प्रमाणात दारू आणि इतर नशेच्या गोष्टी आत कशा जातात? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
मागील जुलै महिन्यापासून माझ्या रुममेट्स दारु पितात, सिगारेट ओढतात अंमली पदार्थांचे सेवन करुन त्रास देत होत्या. त्यांच्या या व्यसनांमुळे मला मायग्रेनचा त्रास झाला असून माझा मानसिक, शारिरीक छळ करण्यात आला. या मुलींकडून अश्लील शिवीगाळ करण्यात आली, असे या मुलीने म्हटले आहे. या त्रासाला कंटाळून पिडीत मुलीने वारंवार तक्रार केली होती.
मात्र पीडित व्यक्तीला न्याय देण्याऐवजी ज्या व्यक्ती विद्यार्थ्यांनी अन्याय केला त्या विद्यार्थ्यांच्या प्राध्यापकांनी मिळत व्यक्तीवर दबाव आणण्याचे काम केले जात आहे असा आरोप करण्यात येत आहे. याबाबत एबीव्हीपीने आक्रमक भूमिका घेतली असून या सर्व प्रकारावर चौकशी समिती गठित करण्याची कुलगुरूंना विनंती करत आहोत. या सर्व प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कटरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशीही मागणी करण्यात आली आहे

ABVP च्या वतीने लेखी पत्र व्यवहार करून या सर्व प्रकारावर चौकशी समिती गठित करण्याची कुलगुरूंना विनंती करत आहोत. या सर्व प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कटरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.
नक्की वाचा - CM Devendra Fadnavis : नागपुरात नेमकं काय घडलं? CM फडणवीसांनी विधानसभेत घटनाक्रम सांगितला
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world