- सूरज कसबे, प्रतिनिधी
Pune Dowry Case: आणखी एका महिलेचा हुंडाबळी गेल्याने पुणे हादरलंय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी (27 जानेवारी) दीप्ती मगर-चौधरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलंय. भेटीनंतर रुपाली चाकणकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळेस चाकणकर यांनी सांगितलं की, मगर कुटुंबीयांनी उरळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय. 25 जानेवारी रोजी सासरच्या जाचाला कंटाळून दीप्ती मगर-चौधरीने राहत्या घरी आत्महत्या केली. पती आणि सासूला अटक करण्यात आलीय, दोघांनाही 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. सासरा-दीर फरार आहेत. जोपर्यंत आरोपी सापडत नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाहीत, असा पवित्रा मगर कुटुंबाने घेतलाय. दीप्तीचे बाळ तिच्या कुटुंबाकडे असल्याचीही माहिती त्यांनी दिलीय.
गर्भपात कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला? याचीही चौकशी होणार
दीप्तीचा गर्भपात कोणत्या रुग्णालयात करण्यात आला? कोणी केला? कोणाच्या सांगण्यावरून केला? याबाबत वैद्यकीय विभाग आणि पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. दरम्यान या घटनेत पहिली मुलगी झाली त्यानंतर त्रास द्यायला सुरुवात केली. पुन्हा दुसरी मुलगी होणार म्हणून गर्भपात केला, अशीही माहिती रुपाली चाकणकर यांनी दिलीय. आरोपींना फाशीची शिक्षा कशी होईल, हे पाहणार असल्याचेही आश्वासन चाकणकर यांनी दिलंय.
पुण्याच्या ता. हवेलीतील सोरतापवाडी येथील विवाहितेने सासरकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. माहेरून पैसे आणण्यासाठी सदर पीडितेला वारंवार त्रास दिला जात होता, गर्भधारणा झालेली असताना मुलीचा गर्भ असल्याने जबरदस्ती गर्भपात करत स्त्री भ्रूण हत्या ही करण्यात आली होती.
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) January 25, 2026

Photo Credit: NDTV Marathi
(नक्की वाचा: Pune News: पुण्यात हुंडाबळी! पैशांची मागणी अन् छळ अखेर कंटाळून इंजिनिअर महिलेची 3 वर्षीय मुलीसमोरच आत्महत्या)
रुपाली चाकणकर यांचे आवाहन
हुंडाबळीशी संबंधित कायदे कठोर आहेत. तक्रार करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. 2 जुलै 2025 रोजी नवे कायदे आले आहेत. आता घरगुती हिंसाचाराचे अनेक प्रकार घडतात, त्याबाबत पीडित महिला ऑनलाइनही तक्रार करू शकतात. या घटनेत कुटुंबीयांनी सांगितलं की दीप्तीने त्यांच्याकडे अनेकदा तक्रार केली होती. मी कुटुंबीयांना आवाहन करते की त्यांनी पुढ येऊन तक्रार केली पाहिजे. या घटनेत राजकीय हस्तक्षेप झाला नाही आणि कोणाला करताही येणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world