Pune News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील मुख्य जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी मंगळवारी (24 मार्च 2026) शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची घोषणा पुणे महानगरपालिकेने केली आहे. बुधवारी (25 मार्च) सकाळी पाणीपुरवठा पूर्ववत होणार असला, तरी नागरिकांनी उपलब्ध पाणी नियोजनाने वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पाणी कपात असणारे मुख्य भाग | Pune Water Cut News
24 मार्च रोजी खालील परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल
- सेनापती बापट रोड: रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा (डावीकडील आणि उजवीकडील) परिसर.
- गोखले नगर परिसर: आशानगर, गोखले नगर, बहीरटवडी.
- शिवाजीनगर आणि मॉडेल कॉलनी: मॉडर्न कॉलेज शेजारील परिसर, मॉडेल कॉलनी, चिखलवाडी.
- औंध-बाणेर पट्टा: भोसले नगर, कॅशरकर वाडी, औंध आणि बाणेरचा काही भाग.
- बोपोडी: संपूर्ण बोपोडी परिसर.
पाणीपुरवठा कधी पूर्ववत होणार?
महानगरपालिकेने दिलेल्या निवेदनानुसार, जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी रात्री उशीरापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर बुधवार (25 मार्च 2026) रोजी सकाळी सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्ववत आणि सुरळीत सुरू होईल.
(नक्की वाचा: Pune News: पुण्यात MPSC, UPSC विद्यार्थ्यांची उपासमार; 'इडली'वर भागवावी लागतेय भूक)
(नक्की वाचा: PCMC News: सावधान! 'कडक फुलचंद' खाताय? तुम्हीही व्हाल शिकार; पान खाताच गुंगी, पुण्यात धक्कादायक प्रकार)
प्रशासनाचे आवाहन
विद्यापीठ चौकातील मेट्रोचे काम किंवा रस्ते विकासकामांच्या पार्श्वभूमीवर ही दुरुस्ती महत्त्वाची असल्याचे समजते. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ही कपात असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने आगाऊ सूचना दिली आहे. नागरिकांनी मंगळवारसाठी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा अपव्यय टाळून सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world