जाहिरात

PMC Election 2026: पुण्यात अजित पवारांचा धमाका! भाजप-सेनेला धक्का; अखेरच्या क्षणी काय घडलं?

पक्ष प्रवेशाने  भाजप, मनसे, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट ,एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

PMC Election 2026: पुण्यात अजित पवारांचा धमाका! भाजप-सेनेला धक्का; अखेरच्या क्षणी काय घडलं?

रेवती हिंगवे, पुणे:

Pune Municiple Corporation Election News: राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यात आपली ताकद दाखवल्यानंतर अजित पवार महापालिकेसाठी डावपेच आखत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र येत असल्याने महायुतीसमोर मोठे आव्हान असणार आहे. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सुरु असलेल्या इनकमिंगने सर्वपक्षीयांना जोर का झटका दिला आहे. 

अजित पवारांचा सर्वपक्षीयांना धक्का, पक्षप्रवेशाने ताकद वाढली..

पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग पाहायला मिळत आहे. सोमवारी एकाच दिवसात अजित पवार यांच्या पक्षात 9 जणांनी प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने  भाजप, मनसे, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट ,एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

BMC Election 2026: मुंबई, ठाण्यात भाजप- शिवसेनेचे जागा वाटप ठरले! कोण किती जागा लढणार?

या पक्षप्रवेशामध्ये भाजपचे धनंजय जाधव, शंकर पवार, मुकारी अलगुडे, मधुकर मुसळे, काँग्रेसचे दत्ता बहिरट, मनसेचे जयराज लांडगे, शिवसेनेचे नीता मांजळकर, आनंद मांजळकर तर राष्ट्रवादी शरद पवार गटातून स्वप्निल दुधाणे यांचा समावेश आहे. या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पक्षाची ताकद चांगलीच वाढणार आहे. 

भाजप- शिवसेनेचं ठरेना...

दरम्यान, एकीकडे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असतानाच भाजप आणि शिवसेना युती काही होत नसल्याचे दिसत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून  पुणे शहरासाठी भाजप शिवसेना युतीचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे पुण्यात शिवसेना आणि भाजप पक्षाची युती होणार की शिवसेना स्वबळावर लढणार? याबाबत सस्पेन्स अद्याप कायम आहे.

Mumbai BMC Elections 2026: आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, वाचा सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

याबाबतच आज मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पुण्यातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पुणे महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढायचं की स्वबळावर लढायचं? याबाबतची अधिकृत घोषणा उदय सामंत करणार आहेत. दरम्यान, एकीकडे आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना अद्याप युतीचा निर्णय झाला नसल्याने कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com