जाहिरात

Pune News: 'एक कोटींची जमीन 1 रुपये भाडे...', तरीही मंगेशकर हॉस्पिटलची पैशासाठी मग्रुरी का?

Pune Deenanath Mangeshkar Hospital Latest News: रुग्णालयांने मात्र 10 लाख रूपये आगाउ भरले नाहीत म्हणून उपचार नाकारले आणि रूग्ण दगावला. काय अर्थ लावायचा या सगळ्यांचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

Pune News: 'एक कोटींची जमीन 1 रुपये भाडे...', तरीही मंगेशकर हॉस्पिटलची पैशासाठी मग्रुरी का?

Pune Deenanath Mangeshkar Hospital News: गर्भवती महिलेच्या उपचारात दाखवलेली असंवेदनशीलता आणि त्यानंतर जुळ्या मुलींना जन्म देणाऱ्या मातेच्या मृत्यूनंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचारास नकार दिल्याने तसेच दुसरीकडे वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला, या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहेय. धर्मदायचे लेबल लावून ुपैशांचा बाजार चालला असल्याची टीका होत आहे. यावरुनच सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

10 कोटीची जागा एका रुपयात दिली...

सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आर्थिक व्यवहारावरुन गंभीर आरोप केले आहेत. आत्ता आत्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य शासनाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुण्यातील जवळपास आठ हजार चौरस फुट जागा वार्षिक नाम मात्र एक रुपया भाड्याने दिली आहे.यापूर्वी रुग्णालयासाठी दिलेली जमीन ही अशीच नामामात्र भाड्याने दिलेली आहे. आत्ता दिलेल्या जमिनीची किंमत सध्याच्या बाजार भावाने कमीत कमी 10 कोटी रूपये तरी असेल. रुग्णालयांने मात्र 10 लाख रूपये आगाउ भरले नाहीत म्हणून उपचार नाकारले आणि रूग्ण दगावला. काय अर्थ लावायचा या सगळ्यांचा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

Sagar Karande News: महिलेच्या जाळ्यात फसला! 150 रुपयांचा मोह, सागर कारंडेकडून 60 लाख लुटले, कसा झाला स्कॅम?

हे अमानवी कृत्य...

तसेच "दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने आधी पैसे भरले नाहीत म्हणून रुग्णावर उपचार नाकारले. हॉटेलमध्ये सुद्धा जेवण झाल्यानंतर बिल घेतात, गाडी दुरूस्त करणारासुद्धा काम झाल्यानंतर बिल घेतो. मात्र खाजगी रुग्णालयामध्ये पेशंटने आधी पैसे भरल्याशिवाय त्याला हात सुद्धा लावला जात नाही. त्याची काही कारणे कदाचित असतीलही परंतु कारणं काहीही असोत असं करणं हे अमानवी आहे एवढं नक्की," अशी खंतही व्यक्त केली आहे. 

त्याचबरोबर यात शासन आणि पुणे महापालिका प्रशासन यांची काय भूमिका असणार आहे? की मूग गिळून गप्प बसणार आहेत? अशा रुग्णालयांना आतापर्यंत काय आणि किती सवलती दिल्या, किती वेळा कोणत्या कारणांसाठी दंड लावला आणि तो वसूल केला की नाही ? याची श्वेतपत्रिका दोघांनी प्रसिद्ध केली पाहिजे. पैशाअभावी कुणावरही उपचार नाकारले जाणार नाहीत हे पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि थोडासा दंडुका उगारला तर ते सहज शक्य आहे. सरकारी कुबड्यांशिवाय अशी रुग्णालये श्वासही घेउ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. फक्त सरकारला रुग्णांची काळजी घ्यायला पाहिजे असे कधी वाटणार एवढाच खरा प्रश्न आहे... असेही ते म्हणालेत. 

Pune Protest: मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप.. शिवसैनिकांनी चिल्लर फेकली, काळे फासले!