
पुणे: पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर या धर्मादाय रुग्णालयाने पैसे न भरल्याने एका गर्भवती महिलेवर उपचारास नकार दिला ज्यानंतर दोन जुळ्या बाळांना जन्म दिलेल्या महिलेला जीव गमवावा लागला. पैसे न भरल्याने रुग्णालय प्रशासनाने या महिलेस परत पाठवले आणि पुढील रुग्णालयात लवकर उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आज मंगेशकर रुग्णालयासमोर आंदोलने केली जात आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट तसेच शिंदे गटाकडून आज रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात आले. चॅरिटेबल ट्रस्ट असून रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरु असल्याचा आरोप करत शिवसैनिक यावेळी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. संतप्त आंदोलकांनी यावेळी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला तसेच अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लरही फेकल्या.
दुसरीकडे, जनतेचा उद्रेक वाढल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दीनानाथ रुग्णालय शासनाकडे संपूर्ण अहवाल पाठवणार आहे. संपूर्ण माहिती शासनाला दिल्याशिवाय आता काही बोलता येणार नाही. जी माहिती समोर आली आहे ती दिशाभूल करणारी आहे. माध्यमांसमोर जी माहिती आली आहे ती अपूर्ण आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय लवकरच योग्य भूमिका स्पष्ट करणार आहे, असे रवी पालेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून दीनानाथ हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. महानगरपालिका आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांच्याकडून ही नोटीस दाखवण्यात येणार असून दीनानाथ हॉस्पिटलकडून महानगरपालिका झालेला प्रकाराचा खुलासा मागवणार आहे. तसेच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणी आरोग्य उपसंचालक राधाकिसन पवार करणार चार समितीय सदस्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यासंबंधीच्या सूचना दिल्या आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world