जाहिरात

Pune News : पुणे ते सातारा अवघ्या 1 तासावर, केंद्र सरकारचा काय आहे प्लान? नितीन गडकरींनी केली पाहणा

पुणे-सातारा नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.

Pune News : पुणे ते सातारा अवघ्या 1 तासावर, केंद्र सरकारचा काय आहे प्लान? नितीन गडकरींनी केली पाहणा

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News : पुणे-सातारा नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. पुण्याहून साताऱ्यापर्यंतचं अंतर ११५ किलोमीटर इतकं आहे. यासाठी जवळपास अडीच तास लागतात. या प्रवासाचं अंतर कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. त्यामुळे प्रवाशांचा तब्बल सव्वा ते दीड तास वाचेल असा अदमास व्यक्त केला जात आहे. 

पुणे ते सातारा प्रवास अवघ्या एका तासावर...

पुणे-सातारा प्रवास अवघ्या एक तासावर आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. यासाठी ६ हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. एकत्रितपणे सर्व मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न केले तर पुण्याहून साताऱ्यापर्यंतचा प्रवास कमी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. खंबाटकी घाट आणि नवले ब्रिज परिसराची नितीन गडकरी यांनी पाहणी केली. त्यांनी वारंवार होणारे अपघात आणि वाहतूक कोंडीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. 

नक्की वाचा - Pune News : ना पेट्रोल दरवाढीची भीती, लांबच लांब रांगाही नको; पुण्याचा शेतकरी 'प्रवासा'तून देतोय अनोखा संदेश

पुणे ते सातारा मार्गाचं अंतर कमी करण्यासाठी काय काय करणार?

  • पुण्यात नव्याने बहुपदरी फ्लायओव्हर्स उभारण्याची योजना
  • पुणे-नगर महामार्ग, वेस्टर्न बायपास आणि सेवा रस्त्यांची कामे प्रस्तावित
  • ट्रक पार्किंग, अतिक्रमण हटाव आणि वन्यजीव संरक्षणावरही भर
  • प्रमुख चौकांमधील प्रवास वेळेत मोठी बचत होण्याची शक्यता
  • राष्ट्रीय महामार्ग अधिक सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी हजारो कोटींचे प्रकल्प हाती


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com