Raigad News: महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणात शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावलेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाडमध्ये मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि पुतण्या महेश गोगावले यांना अद्याप अटक का नाही? असा सवाल उच्च न्यायालयाने रायगड पोलिसांना विचारला आहे. कोर्टामध्ये नेमकं काय घडलं? जाणून घ्या...
विकास गोगावलेंच्या अडचणी वाढणार...?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाड नगरपालिकेच्या २ डिसेंबरला पार पडलेल्या मतदानादिवशी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधे मारामारी झाली होती. यावेळी स्नेहल जगताप समर्थक सुशांत जाबरेंच्या वाहनांची विकास गोगावले यांच्याकडून तोडफोड करण्यात आली होती. मारामारी नंतर परस्परांनी एकमेकांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सुनावणीवेळी कोर्टाने रायगड पोलिसांना खडेबोल सुनावले.
कोर्टाकडून पोलिसांची खरडपट्टी
मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि पुतण्या महेश गोगावले यांना अद्याप अटक का नाही ? असा सवाल उच्च न्यायालयाने रायगड पोलिसांना विचारला. तसेच एका कॅबिनेट मंत्र्याचे नातेवाईक असल्याने तुम्ही मागील दीड महिन्यांपासून आरोपींना अटक करत नाहीत का? असे म्हणत कोर्टाने पोलिसांवर ताशेरे ओढले. कोर्टाच्या या खरडपट्टीनंतर रायगड पोलीस काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आधीही कोर्टाने याप्रकरणी विकास गोगावलेंना मोठा धक्का दिला होता. विकास गोगावले यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. यापूर्वीही दोन वेगवेगळ्या न्यायालयांनी विकास गोगावले यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यामुळेच आता भरत गोगावलेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Mumbai News: कुर्ल्यात भाजप कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला; पेव्हर ब्लॉक आणि धारदार शस्त्रांनी वार