ऋतिक गणकवार, मुंबई
मुंबईच्या कुर्ला भागात राजकीय वैमनस्य आणि फेरीवाल्यांच्या वादातून भाजपच्या तीन प्रमुख कार्यकर्त्यांवर दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या भीषण हल्ल्यात कार्यकर्त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
भाजपचे माजी युवा मोर्चा उत्तर मध्य मुंबई जिल्हा महामंत्री आदित्य पानसे, आकाश सिंग आणि उत्तर मध्य मुंबईचे माजी सोशल मीडिया प्रमुख असीम सिंग हे कुर्ला परिसरातून जात असताना काही मुस्लिम टोळीतील सदस्य आणि फेरीवाल्यांनी त्यांना अडवले. दुचाकीवरून जात असताना फेरीवाल्यांसोबत किरकोळ वाद झाल्याने ही घटना घडली.
टोळक्याने थेट तिघांच्या डोक्यावर पेव्हर ब्लॉक, धारदार शस्त्रे, लोखंडी बास्केट आणि पट्ट्यांनी बेदम मारहाण केली. डोक्यावर पेव्हर ब्लॉक आदळल्याने तिघांच्याही डोक्याला खोलवर जखमा झाल्या आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या नाजूक आहे.
(नक्की वाचा- Mumbai News: मुंबईत उभारले जाणार 30 मजली 'बिहार भवन'; जागा आणि बजेटही ठरले)
हिंदू समाजाचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या
या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आणि भाजप समर्थक मोठ्या संख्येने कुर्ला पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले. सुमारे दोन ते तीन तास संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. दोषींवर तात्काळ कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करावा, केवळ साध्या कलमांत प्रकरण गुंडाळू नये आणि फरार आरोपींना त्वरित अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.
(नक्की वाचा- Mumbai News: मुंबईकरांनो काही दिवस पाणी उकळून प्या आणि जपून वापरा! BMC चं नागरिकांना आवाहन)
कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
कुर्ल्यासारख्या गजबजलेल्या भागात दिवसाढवळ्या राजकीय कार्यकर्त्यांवर अशा प्रकारे प्राणघातक हल्ले होत असतील, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. या हल्ल्यामागे नेमके काय कारण आहे आणि हे नियोजित कारस्थान होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world