
Diwali 2025 : मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस नवरात्रौत्सवानंतर दिवाळीतही बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, 15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत फटाक्यांच्या आवाजासह ढगांचा गडगडाटही ऐकू येणार असल्याची शक्यता आहे. (Rain in Diwali)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 15 ते 18 ऑक्टोबर (17 ऑक्टोबर - वसुबारस, 18 ऑक्टोबर - धनत्रयोदशी, 20 ऑक्टोबर - नरक चतुर्दशी) यादरम्यान विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मान्सून कधी परतणार?
मिळालेल्या माहितीनुसार, परतीच्या मान्सूनने सोमवारी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झापखंड, ओरिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा ओलांडला आहे. सध्या परतीच्या मान्सूनने कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यात प्रवेश केला आहे. सध्या देशातील परतीच्या क्षेत्रापैकी ८५ टक्के भाग व्यापला असून पुढील तीन दिवसात देशाच्या उर्वरित भागातून मान्सून परतेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
नक्की वाचा - SSC HSC Exam Dates: 10 वी, 12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर, कोणता पेपर कधी? पाहा संपूर्ण वेळापत्रक
पुणे मुंबईत कसं असेल वातावरण?
वसुबारस आणि धनत्रयोदशी या दिवशी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, बीड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागानुसार यलो अलर्ट देण्यात आला असून ढगांचा गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world