
मान्सून महाराष्ट्रात लवकर दाखल झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्याने दमदार हजेरही ही लावली आहे. पण एक असा जिल्हा आहे तिथे सरासरी पेक्षा सातपट जास्त पाऊस झाला आहे. मे महिन्यात ऐवढा पाऊस झाल्यामुळे प्रशासन ही हबकलं आहे. मात्र त्यामुळे जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासाही मिळाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातल्या नागरिकांना अधिक सतर्क राहावं लागणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हा जिल्हा सोलापूर आहे. जिल्ह्यात सरासरी 32 मिलिमीटर इतका पाऊस पडतो. मात्र आत्ताच 171 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे सात पट पावसाची क्षमता वाढली आहे. येणाऱ्या पंढरपूरच्या वारीत देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन प्रणाली कार्यरत असणार आहे. अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा सोलापूर जिल्ह्यात 108% पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे कायमच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होईल. माळशिरस आणि पंढरपूर सारख्या ठिकाणी नागरिकांना बचाव कार्य करावे लागेल. त्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे. आजच याबाबत बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली आहे. तर उजनी धरण गेल्या काही दिवसात पावसामुळे पंधरा टक्के क्षमतेने वधारले असल्याचे देखील जिल्हाधिकारी म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - Maharashtra Rain : नागरिकांनो घरातच थांबा, मुंबईसह 'या' 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट
राज्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. सोलापूरमध्ये तसा तुलनेने कमी पाऊस पडतो. असं असलं तरी यावेळी मात्र सोलापूरमध्ये दमदार पाऊस झाला आहे. राज्यात कोकण आणि मुंबईसह इतर भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. वारी वेळी ही पाऊस येवू शकतो असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. जेणे करून वारीमध्ये कोणते अडथळे येणार नाहीत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world