
Raj Thackeray- Uddhav Thackeray Marathi Language Victory Rally: हिंदी भाषेच्या सक्तीकरणाच्या विरोधात मनसेचे राज ठाकरे आणि ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारविरोधात रान पेटवलं होतं आता शासनाने हिंदी सक्तीकरणा संदर्भातला शासकीय आदेश रद्द केल्यानंतरपाच जुलै रोजी मुंबई वरळी येथे विजयोत्सव साजरा केला जाणार आहे या उत्सवाकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
Raj-Uddhav Thackeray: वाजत गाजत या, गुलाल उधळत या! राज आणि उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आमंत्रण
गेल्या अनेक कालावधीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे एकत्रित देत आहेत त्यात प्रामुख्याने पहिल्यांदा भाषण कुणाचं होणार आणि या संपूर्ण मेळाव्याचा भाषण समारोप कुणाच्या माध्यमातून होणार याची जोरदार चर्चा आहे. एनडीटीव्ही ला मिळालेल्या माहितीनुसार, मेळाव्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे प्रथम भाषण करतील आणि या मेळाव्याचे समारोप भाषण राज ठाकरे यांच्याद्वारे होणार आहे.
महाराष्ट्रातल्या एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा !#मराठी #महाराष्ट्र #राजठाकरे #MNSAdhikrut pic.twitter.com/ckf0AxpfKW
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 2, 2025
राज ठाकरे (Raj Thackeray) या संपूर्ण मेळाव्याचं आकर्षणाचा केंद्र असल्याने उद्धव ठाकरे यांच्यानंतर त्यांचे भाषण ठेवण्यात आल्याची माहिती समजत आहे. वरळी डोम येथे आयोजित केलेल्या उत्सव मेळावामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांचा फोटो झेंडा नसेल. स्टेजवर जे पक्षांचे प्रमुख नेते प्रदेशाध्यक्ष उपस्थित असतील त्यापैकी एकालाच आसन व्यवस्था स्टेजवर बसण्यासाठी असेल, इतर सर्व नेते पब्लिकमध्ये समोर बसतील. कोणतेही राजकीय फ्लेक्स बाजी करू नये अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
Raj Thackeray On Hindi Controversy: "5 जुलै रोजी विजयी मेळावा होणार", राज ठाकरे यांची घोषणा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world