
Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: त्रिभाषा सूत्र, हिंदी भाषा सक्ती याविरोधात दोन्ही ठाकरे बंधू उभे ठाकले. त्यांनी हिंदी सक्तीचा विरोध करत भूमिका घेतली. यानंतर पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचा निर्णय सरकारनं रद्द केला होता. या सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंनी एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता, मात्र सरकारने हिंदीबद्दलचा निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजयी सभा घेण्याचे निश्चित केले होते. वरळीतील NSCI डोममध्ये ही सभा आयोजित करण्यात आली होती.
( नक्की वाचा: राज ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे )
1) विजयी मेळाव्याची मोठी उत्सुकता
हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी वेगवेगळे मोर्चे काढण्याचं ठरवलं होतं. मात्र नंतर या दोघांनी एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर या दोघांनी मोर्चाऐवजी विजयी मेळावा काढण्याचं निश्चित केलं होतं.

Photo Credit: PTI
2. ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्यासाठी तोबा गर्दी
शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, मराठी माणसाने तोबा गर्दी केली होती. ही गर्दी आवरताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते.

Photo Credit: PTI
3.राज आणि उद्धव ठाकरेंची फिल्मी एन्ट्री
राज आणि उद्धव ठाकरे सभास्थानी आले तेव्हा NSCI डोममधे अंधार करण्यात आला होता. हे दोघे मंचावर येताच सगळा फोकस या दोघांवरच होता.

Photo Credit: PTI
4) टाळ्यांचा कडकडाट, प्रचंड घोषणाबाजी
राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवत उपस्थितांना हात वर करून अभिवादन केलं, यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या दोघांचे स्वागत केले.

Photo Credit: PTI
5) काँग्रेस नेत्यांनी फिरवली पाठ
राज आणि उद्धव ठाकरेंच्या विजयी सभेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड, डाव्या पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी, रासपचे प्रमुख महादेव जानकर उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मात्र या विजयी सभेला उपस्थित नव्हते.

Photo Credit: PTI
6. फोटो टीपण्यासाठी लगबग
राज आणि उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना पाहून नमस्कार करताच तो क्षण टीपण्यासाठी फोटोग्राफर्सची लगबग उडाली होती. 18 वर्षांनी हे दोघे एकत्र आल्याने या दोघांचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर्स धडपड करताना दिसत होते.

Photo Credit: PTI
7.कार्यकर्ते खूश झाले
ठाकरे बंधू एकत्र यावे अशी मनसे आणि शिवसेना(उबाठा) पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा तणाव निर्माण झाला होता, दोन्ही नेत्यांनी एकमेकांवरही बरीच टीका केली होती. तरीही या दोघांनी एकत्र यावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा आज पूर्ण होताना दिसली.

Photo Credit: PTI
8. भाषणांबद्दल उत्सुकता
भाषणांबद्दल उत्सुकता या विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरे पहिले बोलणार का उद्धव ठाकरे याबद्दल उत्सुकता होती. या सभेत राज ठाकरेंनी पहिले भाषण केले आणि उद्धव ठाकरेंनी समारोपाचे भाषण केले.

Photo Credit: PTI
9. आदित्य-अमित एकत्र आले
ठाकरेंची पुढची पिढी म्हणजेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे देखील कार्यक्रम संपल्यानंतर मंचावर आले होते. या दोघांनी आपापल्या वडिलांप्रमाणे उपस्थितांना अभिवादन केलं.

Photo Credit: PTI
10. ठाकरे कुटुंबही एकत्रित आले
कार्यक्रम संपल्यानंतर संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आले होते.

Photo Credit: PTI
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world