जाहिरात

Rapido Bike Service : कोण आहेत 6700 कोटींची कंपनी 'रॅपिडो'चे मालक?

Action against Rapido: महाराष्ट्राचे परीवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रॅपिडो कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगितले आहे.

Rapido Bike Service : कोण आहेत 6700 कोटींची कंपनी 'रॅपिडो'चे मालक?
Rapido Bike Taxi Service : या कंपनीने अवघ्या 10 वर्षांत आपले साम्राज्य उभे केले आहे.
मुंबई:

Maharashtra Minister Action against Rapido: महाराष्ट्रामध्ये बाईक टॅक्सी धोरण (Bike Taxi Policy)  जाहीर करण्यात आले आहे खरे मात्र अजून कोणत्याही कंपनीला बाईक टॅक्सी चालवण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. असं असतानाही Rapido कंपनीची बाईक सेवा मुंबईमध्ये सुरू आहे. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी याची शहानिशा करण्यासाठी रॅपिडोवरून बुकींग करत एक बाईक बोलावली, जी आली देखील. सरनाईक यांनी या घटनेचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे.

( नक्की वाचा: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले )

रॅपिडोविरोधात गुन्हा दाखल होणार

यानंतर सरनाईक यांनी रॅपिडो कंपनीविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले ( Action Against Rapido Bike Taxi Service ). या घटनेनंतर रॅपिडो कंपनी चर्चेमध्ये आली असून ही कंपनी कोणाच्या मालकीची आहे असे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. ही कंपनी दोन तरुणांनी मिळून उभी केली असून या कंपनीचे मूल्य 6700 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. 

( नक्की वाचा: ओला, उबेरचं भाडं दुप्पट होणार, सरकारनं दिली परवानगी! वाचा काय आहेत नियम? )

अवघ्या 10 वर्षांत उभे राहीले साम्राज्य

 IIT Kharagpur मधून शिकून बाहेर पडलेला पवन गुंतुपल्ली आणि त्याचा मित्र अरविंद सांका (Pavan Guntupalli and Arvind Sanka) हे या कंपनीचे मालक आहेत. या दोघांनी मिळून मालवाहतुकीसाठी एक सेवा सुरू केली होती, मात्र त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नव्हता. भारतातील मोठ्या शहरांमध्ये परवडणाऱ्या दरात वाहतूकसेवा मिळावी या उद्देशाने या दोघांनी ओला उबरच्या धर्तीवर बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. 75 कंपन्यांकडे या दोघांनी आपल्या कंपनीला आर्थिक पाठबळ द्यावे यासाठी मदत मागितली होती, मात्र सगळ्यांनी नकार दिला. हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाळ यांनी या कंपनीचे महत्त्व ओळखून त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. 2016 साली ही कंपनी अधिकृतरित्या सुरू झाली होती. या कंपनीचे आजघडीला 7 लाखांहून अधिक ग्राहक असून 50 हजारांपेक्षा जास्त रायडर्स या सेवेसोबत जोडले गेले आहेत. 100 हून अधिक शहरांमध्ये या कंपनीची सेवा उपलब्ध असून भविष्यात या कंपनीच्या सेवेचा विस्तार इतरही शहरांत होण्याची दाट शक्यता आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com