Amravati Politics: रवी राणा विरुद्ध नवनीत राणा? युवा स्वाभिमान पार्टीचा स्वबळाचा निर्णय

Ravi Rana vs Navneet Rana: युवा स्वाभिमान पक्षाने कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

शुभम बायस्कार, अमरावती

अमरावतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पती आणि विद्यमान आमदार रवी राणा यांच्या विरोधात प्रचार करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

युवा स्वाभिमान पक्षाने कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. हा निर्णय आमदार रवी राणा लवकरच अधिकृतपणे जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, तीन दिवसांपूर्वी झालेल्या युवा स्वाभिमान पार्टीच्या महाराष्ट्र कार्यकारिणी बैठकीत भाजपसोबत युती करण्याचा ठराव मंजूर झाला होता. मात्र, कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधामुळे आता पक्षाने स्वतंत्र लढाईची तयारी सुरू केली आहे.

(नक्की वाचा-  Election News: पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? भाजपला शह देण्याची रणनीती)

भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टी यांची युती न झाल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. नवनीत राणा या भाजपच्या नेत्या असल्याने त्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करतील, तर रवी राणा आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या विरोधात प्रचार करताना दिसतील, हे जवळपास निश्चित झाले आहे.

या घडामोडींमुळे अमरावतीतील स्थानिक स्वराज्य निवडणुका अधिक रंगतदार होणार आहेत. राणा दांपत्याच्या राजकीय मतभेदांमुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. पुढील काही दिवसांत रवी राणा यांचा अधिकृत निर्णय आणि नवनीत राणा यांची भूमिका स्पष्ट होईल.

Advertisement

Topics mentioned in this article