Latur News: रवींद्र चव्हाणांना घरचा आहेर; विलासराव देशमुखांबद्दलच्या विधानावर भाजप कार्यकर्त्यांचा संताप

रवींद्र चव्हाणांच्या विधानानंतर लातूरमधील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. कार्यकर्त्यांच्या मते, आज लातूर जे काही वैभवसंपन्न दिसत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधील एका मेळाव्यात माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. विशेष म्हणजे, या विधानानंतर केवळ विरोधकच नव्हे, तर भाजपच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांनीही नाराजी व्यक्त करत चव्हाण यांना घरचा आहेर दिला आहे. "लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील," या चव्हाणांच्या विधानाचा भाजप कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध केला आहे.

नेमका वाद काय?

सोमवारी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले होते की, "कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही." या विधानानंतर लातूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

(नक्की वाचा-  Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

भाजप कार्यकर्त्यांची भूमिका "विलासराव लातूरची अस्मिता"

रवींद्र चव्हाणांच्या विधानानंतर लातूरमधील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. कार्यकर्त्यांच्या मते, आज लातूर जे काही वैभवसंपन्न दिसत आहे, त्याचे श्रेय विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीला जाते. राजकारण आपल्या जागी असले तरी, लातूरला राष्ट्रीय स्तरावर ओळख विलासरावांनी मिळवून दिली. त्यांच्याबद्दल असे बोलणे चुकीचे आहे," असे मत भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

माफीची मागणी

भाजपने विलासरावांच्या कामाची तुलना करत स्वतःचे काम मोठे असल्याचे सांगितले असते तर चालले असते. पण त्यांच्या आठवणी पुसण्याची भाषा करणे हे लातूरच्या अस्मितेचा अपमान असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याबद्दल रवींद्र चव्हाण यांनी माफी मागावी अशी मागणी देखील भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Badlapur News: बदलापुरात रात्रीच्या वेळी भयंकर घडतंय, धडकी भरवणारा VIDEO आला समोर)

रवींद्र चव्हाणांचा माफीनामा

विलासराव फार मोठे नेते होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. मात्र त्यांनाच पुढे करुन काँग्रेस लातूरमध्ये मते मागत आहे. त्यामुळे त्याठिकाणी आता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेले काम, महायुतीच्या बाबतीमध्ये त्याठिकाणी केलेले काम, या विकासात्मक दृष्टीच्या मी असं बोललो. तरीही त्यांच्या चिरंजीवांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो, असं रवींद्र चव्हाण म्हणाले.

Topics mentioned in this article