जाहिरात

Rohit Pawar : 'मुख्यमंत्री काय भज्या तळायला आहेत का?' 'ते' फोटो पाहून रोहित पवारांचा राग अनावर

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन बंद पाडू अशा शब्दात रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Rohit Pawar : 'मुख्यमंत्री काय भज्या तळायला आहेत का?' 'ते' फोटो पाहून रोहित पवारांचा राग अनावर

Rohit Pawar on Dhananjay Munde's resignation : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संतापजनक फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जात आहे. संतोष देशमुखांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. इतकच नव्हे तर सेल्फी काढत व्हिडिओही शूट करण्यात आला होता. हा प्रकार संतापजनक असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांसह, भाजप नेते सुरेश धस यांच्यासह विरोधी पक्षाकडून यावर संताप व्यक्त केला जात आहे. R

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रोहित पवार यांनी या सर्व प्रकरणावर संताप व्यक्त केला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे, तुमची मैत्री कचऱ्यात टाका आणि आजच्या आज धनंजय मुंडेंचा राजीनामा सरकारने घेतलाच पाहिजे,  अशी मागणी रोहित पवारांनी केली. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेचा खास आहे. त्यामुळे सरकार कराडची पाठराखण करत आहे. एक पुतण्या म्हणून अजित दादांना मला सांगायचं आहे की, दादांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचा तत्काळ राजीनामा घ्यावा, असंही ते म्हणाले.

पंकजा मुंडे यांनी समोर येऊन संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करायला हवा. आज मोठे मुंडे असते तर धनंजय मुंडेला चोपलं असतं. मात्र आज धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही. जच्या आज निर्णय घेतला पाहिजे.  संतोष देशमुखांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणात कराडला 7-8 वर्षांची शिक्षा होईल. सगळ्या लोकांना फाशी व्हायलाच पाहिजे. काल रात्री मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाली. काय चर्चा झाली माहीत नाही. मात्र आज मुंडेचा राजीनामा घेतलाच पाहिले. अन्यथा महाराष्ट्र माफ करणार नाही. 

Dhananjay Munde resignation : आताची सर्वात मोठी बातमी; धनंजय मुंडेंनी काल रात्रीच पक्षाकडे राजीनामा सोपवला

नक्की वाचा - Dhananjay Munde resignation : आताची सर्वात मोठी बातमी; धनंजय मुंडेंनी काल रात्रीच पक्षाकडे राजीनामा सोपवला

मुख्यमंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आधीपासून आग्रही असल्याच्या प्रश्नाबाबत रोहित पवार म्हणाले, मग मुख्यमंत्री काय भज्या तळायला आहेत का? मुख्यमंत्र्यानी त्यांची ताकद दाखवायला हवी. तुमच्याकडे 2 महिन्यांपूर्वी संतोष देशमुखांचे फोटो आलेत. काल ते फोटो पाहिल्यानंतर आम्हाला झोप लागली नाही, अख्ख्या महाराष्ट्राला झोप आली नाही.  तुम्ही मैत्री जपताय, सरकार जपताय, राजकारण जपयात पण माणुसकी जपणं तुम्हाला जमलं नाही. 

उद्या एका महिलेचा रेप झाला आणि भाजपचा कार्यकर्ता असेल तर सोडणार का? आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणात कराड आरोपी आहे त्याला फाशी द्या. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यात खूप जवळचे संबंध आहेत. धनंजय मुंडेचे सर्व व्यवहार वाल्मिक कराड पाहायचा. दोघेजण कपडेही शेअर करायचे असं म्हणायला हरकत नाही. सरकारमध्ये असलेली व्यक्ती काहीही करू शकतो. वाल्मिक कराडला vip ट्रीटमेंट दिली जात आहे. संपर्कातले पोलीस अधिकारी दिमतीला ठेवले आहेत. सरकारमधून कोणी पाठिंबा देत असतील असं म्हणण्यास हरकत नाही. 2014 पासून संविधान मेलं आहे. आज थोरले मुंडे साहेब असतील तर त्यांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला असता.