Sachin Ahir Operation Tiger: ऑपरेशन टायगर अंतर्गत सहा खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंचे अत्यंत निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळखले जाणारे सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी एकनाथ शिंदेंनी सचिन अहिर यांना उमेदवारी देत ठाकरेंना जोर का झटका दिला. सचिन अहिर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकण्याआधी मोठ्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळाले. जाणून घ्या सविस्तर...
Maharashtra Politics: उपसभापती पदासाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला! शिंदेंचा ठाकरेंना सर्वात मोठा धक्का
"अखेरच्या क्षणी म्हणाले मी महायुतीकडून अर्ज भरतो.."
विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. हा अर्ज दाखल करण्यावेळी अंबादास दानवेंनी सचिन अहिर यांनी या अर्ज दाखल करताना फोटो काढू असं म्हटले. त्यावेळेस सचिन अहिर यांनी मी महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल करायला नाही तर महायुतीकडून अर्ज दाखल करायला आलो सांगितले. अहिर यांच्यासोबत उदय सामंत, नीलम गोर्हे, हेमंत पाटील, मनीषा कायंदे आमदर सोबत होते. अहिर यांच्या या विधानामुळे अचनाक मोठा धक्का अंबादास दानवे आणि अंभ्यकर यांना बसला.
सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्यापूर्वी ठाकरेंच्या सर्व आमदारांना मेसेजही पाठवले. मला काही राजकीय पाठींबा नाही किंवा पाठबळ नाही, पण काही कारणं आहेत ज्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत आहे, असं त्यांनी या मेसेजमध्ये म्हटलं आहे. सचिन अहिर यांनी महायुतीकडून उपसभापती अर्ज दाखल केल्यावर लगेच आदित्य ठाकरे यांनाही मेसेज केला. मी एकनाथ शिंदे सोबत आहे. अर्ज दाखल करतो असा मेसेज सचिन अहिर यांनी पाठवला, त्यावर अहिर यांना नाराजीचा मोठा मेसेज रिप्लाय आदित्य ठाकरे यांनी पाठवला.
सुत्रांच्या माहितीनुसार, सचिन अहिर हे गेले तीन दिवस थेट एकनाथ शिंदे यांच्या सोबत संपर्कात होते. उदय सामंत या सर्व प्रकरणात मध्यस्थी करत होते. या निर्णयाच्या आदल्या रात्री त्यांना झोपही लागली नाही. राजकीय अपरिहार्य कारणास्तव हा निर्णय घेतला जात आहे असे सचिन अहिर यांनी म्हटले. तसेच ठाकरे यांच्या समवेत कोणताही वैयक्तिक वाद नाही, असंही त्यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world