जाहिरात

Sai Baba Shirdi : साईंच्या पादुका दर्शन सोहळ्याला उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील, आजपासून भारत भ्रमणाला सुरुवात

भारतभर साईंच्या सव्वाशे वर्षे पुरातन चरण पादुकांच भ्रमण होणार आहे.  

Sai Baba Shirdi : साईंच्या पादुका दर्शन सोहळ्याला उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील, आजपासून भारत भ्रमणाला सुरुवात

सुनील दवंगे, प्रतिनिधी

शिर्डीतील बहुचर्चित साई पादुका दर्शन सोहळ्याला उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर आजपासून साईबाबांच्या मूळ पादुका भारत भ्रमण करणार आहेत. आज सकाळी साईसंस्थानच्या वतीनं विधीवत पूजा करत साईंच्या मूळ चर्म पादुका दर्शन सोहळ्यासाठी रवाना झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात दक्षिण भारतातील आठ शहरांत हा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी सुरक्षाची सर्व खबरदारी साई संस्थानच्या वतीनं घेण्यात आली आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटक तामिळनाडू राज्यात साईसंस्थानच्या वतीनं साई पादुका दर्शन सोहळ्याच आयोजन करण्यात आल असून सकाळी साई मंदिरातून बाबांच्या चर्म पादुका बाहेर काढण्यात आल्या आहे. तसेच याचा सवाद्य मिरवणूक काढत संस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते पुजन करण्यात आलं.

Shirdi News : भिकारी नसताना उचललं, रुग्णालयातच 4 जणांच्या मृत्यूने शिर्डी प्रशासन वादाच्या भोवऱ्यात

नक्की वाचा - Shirdi News : भिकारी नसताना उचललं, रुग्णालयातच 4 जणांच्या मृत्यूने शिर्डी प्रशासन वादाच्या भोवऱ्यात

गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिणेतील भाविकांची बाबांच्या मूळ पादुका दर्शन सोहळा आपल्या भागात आयोजित करावा. भाविकांची मागणी पाहता शिर्डी साईबाबा संस्थांच्या वतीने आज 10 एप्रिलपासून 26 एप्रिलपर्यंत साईबाबांच्या मूळ चर्म पादुका महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू या राज्यातील आठ शहरात भाविकांना दर्शनासाठी असणार आहे.

असा असेल साई चर्म पादुका दौरा सोहळा 

  • 10 ते 13 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रातील सांगली शहर व जिल्ह्यातील पेठ वडगाव येथे भाविकांना दर्शनासाठी साईंच्या मूळ चरण पादुका उपलब्ध असणार आहेत.
  • 14 ते 18 एप्रिलपर्यंत कर्नाटक राज्यातील, दावनगेरे, मल्लेश्वरम येथे सहा दिवस साईबाबांच्या पादुका भाविकांना दर्शनासाठी असणार आहे. यानंतर 19 एप्रिल रोजी सायंकाळी तामिळनाडूकडे पादुका रवाना होणार आहे.
  • 19 ते 26 एप्रिलपर्यंत तामिळनाडू राज्यातील सेलम, करूर, पुलीयमपट्टी, धर्मापुरी येथे साईंच्या पादुका भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असणार असून धर्मापुरी येथून 26 एप्रिल रोजी संध्याकाळी साईंच्या पादुका पुन्हा शिर्डीकडे रवाना होणार आहे. असा तब्बल 2776  किलोमीटरचा साईंच्या मूळ चर्म पादुकांचा दौरा असणार अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: