Abhijit Dipke's wedding discussion : CJP च्या नेतृत्वात जंतर-मंतरवर झालेलं आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह संपलं. सीजेपीच्या या आंदोलनात देशभरातली हजारो तरुण सहभागी झाले होते. एक महिन्याहून अधिक काळ हे आंदोलन सुरू होतं. दिल्लीत इतकं मोठं आंदोलन केल्यानंतर अभिजीत दिपकेची ओळख तरुण नेता म्हणून झाली आहे. यादरम्यान त्याच्या लग्नावरूनही चर्चा सुरू झाली आहे.
अभिजीत दिपके ३० वर्षांचा आहे. त्याच्या आईने एका मुलाखतीत सांगितलं की, जंतर-मंतरवर आंदोलन केल्यानंतर त्याच्यासाठी लग्नाची स्थळं येत आहेत. जेव्हा दिपकेच्या आई-वडिलांना त्याच्या लग्नाबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा दिपकेची आई म्हणाली, सीजेपीच्या आंदोलनाच्या यशानंतर त्याच्यासाठी अनेक स्थळं आली आहेत.
अभिजीतचं लग्न कधी होणार?
अभिजीतच्या आईने सांगितलं की, त्याच्या लग्नासाठी अनेक लोकांकडून विचारणा केली जात आहे. आधीही त्याच्यासाठी अनेक स्थळं येत होती, मात्र आता हे प्रमाण वाढलं आहे. आम्हाला तर वाटतं त्याने उद्याच लग्न करावं. तरीही डिसेंबर-जानेवारी महिन्यात त्याचं लग्न करावं अशी आमची इच्छा असल्याची भावना दिपकेच्या आई-वडिलांनी व्यक्त केली.
अभिजीतच्या आईने पुढे सांगितलं की, त्याला आधीपण अनेक लग्नाची स्थळं आली. तो अमेरिकेत गेल्यावर अनेक नातेवाईक त्याला लग्नाबाबत विचारणा करीत होते. मात्र त्यावेळी तो MSc करीत होता. ते पूर्ण झाल्यावर लग्नाचा विचार करू असं त्याने सांगितल्याचं दिपकेच्या आईने सांगितलं.
आईला कशी सून हवीये?
दीपकेच्या आईला जेव्हा विचारलं की त्यांना कधी सून हवीये, तर त्या म्हणाल्या, सुरुवातीला मला वाटत होतं की, सून साधी असावी. मात्र आता अभिजीत ज्या ठिकाणी पोहोचलाय त्यानंतर त्याला त्याची पार्टनर निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. आम्ही त्याच्या निर्णयाचं समर्थन करू. आता आधीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. सध्याच्या मुलांचा वेगळा विचार आहे.
अभिजीत दिपके कोण आहे?
अभिजीत दिपके सीजेपीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहे. चीफ जस्टिस सूर्यकांतच्या एका टिप्पणीनंतर त्याने इन्स्टाग्रामवर एक पेज तयार केला होता. पाहता पाहता या अकाऊंटवर भाजप आणि काँग्रेसपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले. त्यानंतर त्यांनी नीट पेपरफुटी आणि त्यामुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित केला आणि जंतर मंतर येथे आंदोलनाचे आवाहन केले. सोनम वांगचुकला या आंदोलनाचा चेहरा बनवण्यात आले आणि त्याने २६ दिवस उपोषण केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world