जाहिरात

Samruddhi Highway Accident : लेक कुशीत असताना कारचा भीषण अपघात; 3 चिमुरडींनी गमावला मायेचा हात

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका अद्यापही सुरू असून छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या अपघातामुळे चार चिमुरड्या आईला पोरक्या झाल्या आहेत.

Samruddhi Highway Accident : लेक कुशीत असताना कारचा भीषण अपघात; 3 चिमुरडींनी गमावला मायेचा हात

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका अद्यापही सुरू असून छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या अपघातात एका आईचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर वैजापूर तालुक्याच्या हद्दीत मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पुनम चव्हाण (28) या महिलेचा मृत्यू झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

याशिवाय अजय कुमार चव्हाण (35), देवानंद चव्हाण (28), अनन्या चव्हाण (5), नॅन्सी चव्हाण (6), अनसी चव्हाण (4 महिने) गंभीर जखमी आहेत. या अपघातात तीन लहानग्यांचा समावेश आहे. हे कुटुंब उत्तर प्रदेशातील आहे. ते नाशिकहून जोनपूरच्या दिशेने प्रवास करीत होते. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरच्या वाहनाला धडक बसली. कारचा वेग जास्त असल्याने चालकाला नियंत्रण मिळवता आलं नाही. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. 

Vasai News : फिलिपिन्समध्ये पर्यटनासाठी गेलेल्या वसईतील दाम्पत्याचा अपघाती मृत्यू

नक्की वाचा - Vasai News : फिलिपिन्समध्ये पर्यटनासाठी गेलेल्या वसईतील दाम्पत्याचा अपघाती मृत्यू

अपघातापूर्वी चार महिन्यांची चिमुकली आईच्या कुशीत विसावली होती. त्यादरम्यान गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणं जखमी झाले आहेत. यामध्ये दोन पुरुष आणि तीन चिमुरड्यांचा समावेश आहे. या अपघातात चिमुरड्यांच्या आईचा जागेवरच मृत्यू झाला. सर्व जखमींवर वैजापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com