Sangli News : शाळेतही मुलांच्या हालचालीवर लक्ष ठेवता येणार; ZP शाळेचा महाराष्ट्रातील पहिला जबरदस्त प्रकल्प

मुले शाळेत पोहोचली का आणि शाळेतुन मुलं घरी निघाली का? ही पालकांना भेडसावणारी चिंता एका जिल्हा परिषदेच्या शाळेने सोडवली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

शरद सातपुते, प्रतिनिधी

Sangli Digital Scanner Tractor : मुले शाळेत पोहोचली का आणि शाळेतुन मुलं घरी निघाली का? ही पालकांना भेडसावणारी चिंता एका जिल्हा परिषदेच्या शाळेने सोडवली आहे. डिजिटल आयडेंटिटीच्या (Digital Identity) माध्यमातून सांगलीच्या अलकुड एमच्या जिल्हा परिषदेत शाळेत Digital Identityचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. पाहूया या टेन्शन फ्री शाळेचा स्पेशल रिपोर्ट.

सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील अलकुड एम हे जेमतेम 2 हजार लोकसंख्येचं गाव. या गावातील जिल्हा परिषद शाळेने मुलांच्या सुरक्षेसाठी एक पायलट प्रोजेक्ट राबवला आहे. यामुळे पालकांची आणि शिक्षकांची चिंता मिटणार आहे.

डिजिटल स्कॅनर ट्रॅक्टर कसं काम करतं? 

घरातून शाळेसाठी निघालेली आपली मुले शाळेत वेळेत पोहोचतात की नाही याची चिंता पालकांना असते. दुसरीकडे शाळेतून मुलं घरी वेळेत आणि सुरक्षित पोहोचतात का याची चिंता शिक्षकांना असते. यावरच रामबाण उपाय म्हणून शाळेने विद्यार्थ्यांच्या आयडीकार्डमध्ये स्कॅनर ट्रॅक्टर बसवला आहे. यातून पालकांना मुलांच्या जाण्या-येण्याबद्दल मेसेज पोहोचणार आहे. या प्रोजेक्टचं जिल्ह्यात आणि राज्यात कौतुक होत आहे. एका ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची शक्कल लढवल्याने मुलांचं अपहरण होण्यापासून संरक्षण मिळणार आहे.

देशात आणि राज्यात लहान मुलांचं अपहरण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना म्हणून मुलांना बारकोड स्कॅनर सुविधा अलकुड एम येथील जिल्हा परिषद शाळेने केला आहे. अनेक पालके आपल्या मुलांना शाळेत सोडू शकत नाही किंवा शाळेतून घरी घेऊन येऊ शकत नाही. यासाठी शाळेची असणारी वाहतूक व्यवस्था बसेस खाजगी ऑटो रिक्षा किंवा स्वतःमुले सायकल किंवा पायी आपल्या शाळेचा घरातून प्रवास करत असतात. अनेक वेळा आपल्या पालकांना मुलांची शाळेतून निघालेली वेळ किंवा घरातून निघालेले वेळ याबाबत कल्पना मिळत नाही. म्हणूनच या उपक्रमामुळे पालकांची आणि शिक्षकांची चिंता मिटणार आहे.

Advertisement

नक्की वाचा - Scam News: महाराष्ट्राला हादरवणारा घोटाळा! सौर ऊर्जेच्या नावाखाली कोट्यवधी रुपये हडपले, 'या' कंपन्या रडारवर

मुलांचं लोकेशन कळणार...

डिजिटल आयडेंटिस्ट स्कॅनरमुळे शाळेतील विद्यार्थी गैरहजर राहत असेल तर ते लक्षात येईल. याशिवाय  शाळेतून येण्याजाण्याच्या प्रवासामध्ये बायोमेट्रिक पद्धतीमुळे विद्यार्थ्याचा तपशील समजू शकतो. हा नावीन्यपूर्ण महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प सांगलीतील एका शाळेने राबवला आहे. शाळा सुटल्यावर आणि शाळेत आल्यानंतर पालकांना त्यांच्या व्हॉट्सअॅपवर  मेसेज जाणार आहे. यामध्ये मुलं  सुखरूप शाळेत पोहोचली किंवा घराकडे निघाली याची माहिती मिळेल. त्याचबरोबर या बायोमेट्रिक आयडीमध्ये एक लोकेशन ट्रॅकर आहे. मुलं बेपत्ता झाली की, बारकोड स्कॅन केल्यानंतर शाळेचे लोकेशन समजू शकतं, अशी व्यवस्था आहे. 

आपली मुलं शाळेत जातात का? शाळेत वेळेवर  पोहोचतात का? शाळा सुटल्यावर वेळेवर घरी येतात का? अशा एक ना अनेक प्रश्न सातत्याने पालकांना भेडसावत असतात. मुलांचे अपहरण, वाढती गुन्हेगारी या सर्वच दृष्टीने अलकुड एमम जिल्हा परिषद शाळेने राबवलेला हा डिजिटल आयडेंटिटी स्कॅनर पालकांना नक्कीच टेन्शन फ्री करणार आहे असंच म्हणावं लागेल. 

Advertisement