माझी अब्रू तुमच्या हातात, डोंगर झाडीचे नाव घालवू नका', शहाजी बापूंची भावनिक साद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सांगोल्यामध्ये महायुतीचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना शहाजी बापू पाटील यांनी माझी इज्जत अब्रु तुमच्या हातात आहे, असं म्हणत मतदारांना भावनिक साद घातली.

जाहिरात
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी सांगोला: राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून राज्यभरात महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सांगोल्यामध्ये महायुतीचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना शहाजी बापू पाटील यांनी माझी इज्जत अब्रु तुमच्या हातात आहे, असं म्हणत मतदारांना भावनिक साद घातली.

माझी इज्जत अब्रू तुमच्या हातात  आहे. महाराष्ट्रभर डोंगर झाडीने नाव कमावले, डोंगर, झाडीचे नाव घालवू नका  असे म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे  उमेदवार शहाजी बापू पाटील यांनी मतदारांना भावनिक साद घातली. सांगोला विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेना उमेदवार शहाजी पाटील यांच्या समोर ठाकरे गटाचे दीपक साळुंखे आणि शेकापचे डॉ बाबासाहेब देशमुख यांनी मोठे आव्हान तयार केले आहे. त्यामुळे शहाजी बापू पाटील हे आता भावनिक झाले आहेत.

नक्की वाचा: 'बापू आमच्या टीमचे धोनी, त्यांनी गुवाहाटीही जिंकली', सांगोल्यात CM शिंदेंनी सभा गाजवली

सांगोलामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. त्यापूर्वी आमदार शहाजी पाटील यांनी मतदारांना अत्यंत भावनिक होत आवाहन केले की माझं नाव घालू नका माझी सगळी इज्जत आहोत तुमच्या हातामध्ये आहे.  दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही या सभेत जोरदार फटकेबाजी केली.   शहाजी बापू पाटील अस्सल रांगडा आहे. काय ती भाषा, काय ते डायलॉग, सगळं एकदम ओक्के.बापू बोलायला लागले की भल्याभल्यांची विकेट घेतात, खरंतरं ते आपल्या टीमचे महेंद्रसिंग धोनी आहेत. हा आपला रांगडा गडी आहे, मला सगळं अगदी ओक्के वाटतंय, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. 

महत्वाची बातमी: बच्चू कडूंना धक्का! अधिकृत उमेदवारच गेला काँग्रेसच्या गोटात