जाहिरात

बच्चू कडूंना धक्का! अधिकृत उमेदवारच गेला काँग्रेसच्या गोटात

अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहर विधानसभेत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

बच्चू कडूंना धक्का! अधिकृत उमेदवारच गेला काँग्रेसच्या गोटात
अमरावती:

शुभम बायस्कार

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी महायुती व महाविकास आघाडीला आव्हान देण्यासाठी राज्यात परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन केली आहे. राज्यातील जनतेला पर्याय देण्यासाठी कडूंनी प्रयत्न चालवले आहेत. त्यात बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार काँग्रेसच्या गळाला लागला आहे. बच्चू कडूंना त्यांच्या अमरावती या गृह जिल्ह्यात हा मोठा धक्का बसला आहे. अधिकृत उमेदवारानेच थेट काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू, छत्रपती संभाजी राजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, विदर्भवादी नेते वामनराव चटप यासह समविचारी पक्ष एकत्र आले आहेत. त्यांनी राज्यात परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन केली आहे. परिवर्तन महाशक्ती आघाडी राज्यातील विधानसभा निवडणुकांना एकत्रित समोर जात आहे. तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बच्चू कडू राज्यभर फिरून प्रचार सभा घेत आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - शरद पवारांची पुन्हा भर पावसात सभा, भिजतच ठोकलं भाषण

बच्चू कडूंच्या प्रचार सभांना मोठा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. असं असतानाच अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहर विधानसभेत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या मतदार संघात प्रहारने डॉ.सय्यद अब्रार यांना उमेदवारी दिली होती. ते पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. असं असताना त्यांनी अचनाक निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिवाय त्यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. अमरावती विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.सुनील देशमुख यांचा आपण प्रचार करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केलं आहे.  

ट्रेंडिंग बातमी - 'चला आपण एकत्र येवू', भाजप कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंची साद, नेमकं काय घडलं?

अमरावतीच्या पश्चिम क्षेत्रातील रहिवासी असलेले डॉ.सय्यद अब्रार हे वरिष्ठ दंत शैल्य चिकित्सक आहेत. या भागात मुस्लीम मतांचे अधिक प्राबल्य आहे. हीच बाब हेरत अब्रार यांनी निवडणूक लढवत असल्याचे घोषित केलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. 20 रुपये इतकी कमी रुग्ण तपासणी शुल्क घेऊन ते रुग्णसेवा करतात. त्यामुळे सय्यद अब्रार हे पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आले होते. अब्रार यांच्या या सर्वसामावेशक कामाची नोंद घेत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने त्यांना अमरावती विधानसभेतून उमेदवारी दिली होती. मात्र निवडणुकीपूर्वीच अब्रार यांनी माघार घेतली आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com