जाहिरात

Beed News : संतोष देशमुखांच्या हत्येमुळे विड्यातील 'गर्दभ मिरवणूक' रद्द; 100 वर्षांची जुनी परंपरा नेमकी काय आहे? 

ऐरवी तोऱ्यात वागणारे जावई या दिवसात मात्र गावातून पोबारा होत असताना दिसतात. मात्र ही परंपरा कशी सुरू झाली?

Beed News : संतोष देशमुखांच्या हत्येमुळे विड्यातील 'गर्दभ मिरवणूक' रद्द; 100 वर्षांची जुनी परंपरा नेमकी काय आहे? 

Son-in-law's procession on a donkey : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र स्तब्ध झाला. दरम्यान या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत बीड जिल्ह्यातील विडा (Beed Crime) गावाने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या शंभर वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदा रद्द करण्यात आली आहे. विडा गावचे सरपंच सुरज पटाईट यांनी याबाबत घोषणा केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विडा गावात दरवर्षी होणारी 'गर्दभ धिंड' किंवा गर्दभ मिरवणूक यंदाच्या वर्षी होणार नाही. गेल्या शंभर वर्षांपासून या गावात धुळवडीच्या दिवशी जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढण्यात येते. मात्र मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे या वर्षी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. 

Heat Wave : ऊन भारताला गरीब बनवतंय? वाढत्या उकाड्याचा खिशालाही बसतोय फटका!

नक्की वाचा - Heat Wave : ऊन भारताला गरीब बनवतंय? वाढत्या उकाड्याचा खिशालाही बसतोय फटका!

'गर्दभ धिंड' ही परंपरा नेमकी काय आहे? 
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावात दरवर्षी धुलिवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरुन धिंड काढली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, 1915 सालापासून ही प्रथा सुरू झाली. या काळात निजामाजी राजवट होती. त्यावेळी विडा गाव जहागीरदारीचे गाव होते. त्यावेळी जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांचे जावई धुलिवंदनाला विटामध्ये सासुरवाडीला आले होते. त्यावेळी ते भांग प्यायले. यावेळी थट्टामस्करीत जावयाची गाढवावर बसून सवारी करण्यात आली. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. जावयाची गळ्यात चपलांच्या माळा आणि गाढवावर बसवून मिरवणूक काढली जाते. विशेष म्हणजे जावई शोधण्यासाठी धुलिवंदनाच्या दोन दिवस आधी समितीची स्थापना करण्यात येते. 

मिरवणूक काढल्यानंतर लोकवर्गणीतून जावयाची पाहुणचार केला जातो. ऐरवी गावात मानाने येणारी मंडळी धुलिवंदानाच्या काळात लांब राहणं पसंत करतात. विशेष म्हणजे एकदा मान मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा या जावयाची मिरवणूक काढली जात नाही. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: