जाहिरात

Beed Morcha News: संतोष देशमुख हत्या प्रकरण: बीडमध्ये आज विराट मोर्चा, बड्या नेत्यांसह हजारो नागरिक एकवटणार

आज बीड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता मोर्च्याला सुरवात होणार आहे.

Beed Morcha News: संतोष देशमुख हत्या प्रकरण: बीडमध्ये आज विराट मोर्चा, बड्या नेत्यांसह हजारो नागरिक एकवटणार

स्वानंद पाटील, बीड:  मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य तीन आरोर्पीना तातडीने अटक करावी, सोबतच सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज बीड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता मोर्च्याला सुरवात होणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काळे कपडे व काळ्या फिती लावून मोर्चेकरी या मोर्च्यात सहभागी होणार आहेत. मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बीड शहरातील चार प्रमुख मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवण्यात आली आहे. सोबतच चारशे पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्त असणार आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरात येणारी वाहतूक वळविण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच या मोर्चासाठी वाढीव पोलिस बंदोबस्तही मागविण्यात आला आहे. 

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह  आमदार जितेंद्र आव्हाड,अंजली दमानिया, विनोद पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, सुरेश धस आदी नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपण स्वतंत्र मोर्चा काढणार असल्याचं म्हटलं आहे. 

( नक्की वाचा : Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या हाती पिस्तूल सोबत वाल्मिक कराड, दमानियांनी दाखवले Video )

कसा असेल पोलीस बंदोबस्त?

बीडमध्ये निघणाऱ्या या सर्वपक्षीय मोर्चासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून तब्बल 400 पोलिसांची करडी नजर असणार आहे. यामध्ये 1-अपर पोलिस अधीक्षक, 3- उपअधीक्षक, 8- पीआय, 35- एपीआय, पीएसआय, 350- पोलिस कर्मचारी, 1- एसआरपीएफ तुकडी, 2- दंगल नियंत्रण पथकाची तुकडी असणार आहे. याशिवाय आजच्या मोर्चातील हालचालीवर आकाशातून तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर असणार  आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com