
Maharashtra Politics: एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन धनंजय मुंडेंविरोधात आवाज उठवत असतानाच सुरेश धस यांनी त्यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाल्याची माहिती समोर आली असून त्यांच्या घरी जाऊन मी भेटलो, असे त्यांनी सांगितले आहे. चद्रशेखर बावनकुळे यांनी मी, सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकत्र भेटलो असं सांगितले आहे. त्यानंतर सुरेश धस यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, असे सुरेश धस यांनी सांगितले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे. या हत्या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी थेट मंत्री धनंजय मुंडेविरोधात आवाज उठवले आहे. देशमुख हत्या प्रकरण आणि बीडचा बिहार करण्यामागे आका म्हणजेच धनंजय मुंडेंचाच हात आहे, अशी थेट भूमिका ते घेत आहेत तसेच याप्रकरणात दररोज नवनवे खुलासे करत धनंजय मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
याच प्रकरणात आता मोठा ट्वीस्ट आला असून सुरेश धस यांनी धनंजय मुंडेची भेट घेतल्याचे समोर आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत महत्त्वाचा खुलासा करताना मी सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट झाली. आमची जवळपास 3 तास चर्चा केली, असा गौप्यस्फोट केला. त्यानंतर सुरेश धस यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
भेटीत काय घडलं?
'मी क्लियर सांगतो, परवा रात्री धनंजय मुंडे यांना हॉस्पिटलमधून घरी आले तेव्हा भेटायला गेलो होतो. चंद्रशेखर बावनकुळेही सोबत होते. त्यावेळी बावनकुळेंनी मला विचारलं, तुमच्यात मन भेद आहेत का.?मी स्पष्टपणे सांगितलं नाही, त्यांनी मिटवण्याचे ही सांगितलं पण मी चौकशीत जे येईल ते समोर येईल, 'असं म्हणालो.
तसेच 'धनंजय मुंडे ही म्हणाले मिटवून घ्या, मात्र त्यांना सांगितलं चौकशीत दोषी असाल तर कारवाई होईल. मी त्यांच्याविरोधात आहे, विरोधातच राहणार. धनंजय देशमुख प्रकरणार माघार घेणार नाही..' असेही सुरेश धस म्हणालेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world