जाहिरात

Santosh Deshmukh Case: वाल्मीक कराडची प्रॉपर्टी जप्त होणार? वकिलांचा जोरदार युक्तीवाद, कोर्टात काय घडलं?

सुनावणीत सरकारी युक्तिवाद झालेला असून आरोपींच्या बाजूने आरोपीच्या  वकिलांनी आपली भूमिका मांडली आहे. इतर आरोपींनी देखील न्यायालयाला प्रॉपर्टी जप्त करू नये, अशी विनंती केली आहे.

Santosh Deshmukh Case:  वाल्मीक कराडची प्रॉपर्टी जप्त होणार? वकिलांचा जोरदार युक्तीवाद, कोर्टात काय घडलं?

बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला नाशिक कारागृहात हलवण्याची जोरदार चर्चा सुरू होती... मात्र, ही चर्चा सध्या तरी केवळ अफवाच असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या वाल्मीक कराड बीड कारागृहात असून त्याला नाशिकला हलवण्यात येणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र असा कोणताही अर्ज न्यायालयात दाखल झालेला नाही, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जावर तसेच त्याच्या संपत्तीवर युक्तीवाद करण्यात आला. कोर्टात नेमकं काय घडलं? वाचा..

Vaibhavi Deshmukh : वडिलांचा आधार हरपला… पण जिद्द सोडली नाही! वैभवी देशमुखचं NEET मध्ये घवघवीत यश

कोर्टात काय घडलं?

आजच्या सुनावणीत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जावर तसेच त्याच्या संपत्तीवर लावण्यात आलेल्या सीलबाबत सरकारकडून दाखल करण्यात आलेल्या अर्जावर 22 जुलै रोजी न्यायालय निर्णय देणार आहे, असं निकम यांनी स्पष्ट केलं. या सुनावणीत सरकारी युक्तिवाद झालेला असून आरोपींच्या बाजूने आरोपीच्या  वकिलांनी आपली भूमिका मांडली आहे. इतर आरोपींनी देखील न्यायालयाला प्रॉपर्टी जप्त करू नये, अशी विनंती केली आहे.

दरम्यान, वाल्मीक कराडला नाशिक कारागृहात हलवण्याबाबत सध्या कोणताही अर्ज न्यायालयात आलेला नाही, अशी स्पष्ट माहिती उज्वल निकम यांनी दिली. तसंच, आरोपीला कुठल्या कारागृहात ठेवायचं हे ठरवण्याचा अधिकार हा तुरुंग प्रशासनाचा असून, यामध्ये न्यायालयाची भूमिका नाही, असंही त्यांनी अधोरेखित केलं.

Beed News: “तुझा संतोष देशमुख करतो” म्हणत तरुणावर भररस्त्यात कोयत्याने हल्ला

कराडच्या संपत्तीवर लावलेल्या सीलाववरून काय म्हणाले आरोपीचे वकील?

वाल्मीक कराडच्या बाजूने आता कायदेशीर लढाई अधिक आक्रमक झाली आहे. आरोपीचे वकील अ‍ॅड. विकास खाडे यांनी माहिती दिली की, कराडच्या दोषमुक्तीसाठीचा अर्ज यापूर्वीच दाखल करण्यात आला असून त्यावर युक्तिवादही पूर्ण झाला आहे. याच सुनावणीत आज कराडच्या बँक खात्यांवर व मालमत्तेवर लावण्यात आलेलं सील काढावं, अशी मागणी करण्यात आली.

खाडे यांनी युक्तिवादात स्पष्ट केलं की, सदर बँक खाती व प्रॉपर्टी या गुन्ह्यातून मिळवलेल्या नसून त्यांचा खून प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नाही. त्यामुळे या संपत्तीवर लावलेलं सील रद्द करावं, अशी मागणी आरोपीच्या बाजूने करण्यात आली आहे. सध्या दोषमुक्तीचा अर्ज आणि संपत्तीवरील सीलबाबत न्यायालयीन निर्णयाची प्रतीक्षा आहे, जो २२ जुलै रोजी अपेक्षित असल्याचे आरोपीचे वकील विकास खाडे यांनी म्हटले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com