जाहिरात

Santosh Deshmukh Murder Case: सुदर्शन घुले अन् वाल्मिक कराडला दणका! पोलिसांचा मोठ्या गँगला हिसका; बीडमध्ये मोठी कारवाई

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून मोठे पुरावे हाती सापडल्याचा दावा कोर्टात करण्यात आला आहे. 

Santosh Deshmukh Murder Case:  सुदर्शन घुले अन् वाल्मिक कराडला दणका! पोलिसांचा मोठ्या गँगला हिसका; बीडमध्ये मोठी कारवाई

मोसीन शेख, प्रतिनिधी: बीड

 Santosh Deshmukh Murder Case:  बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले याला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून मोठे पुरावे हाती सापडल्याचा दावा कोर्टात करण्यात आला आहे. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले  याचा मोबाईल तपासण्यासाठी एसआयटीकडून आज पोलीस कस्टडी मागणी करण्यात आली. यावेळी  तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याचा मोबाईलमधील डाटा तपासामध्ये हस्तगत करण्यात आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याच डाटा संदर्भात चौकशी करण्यासाठी सुदर्शन घुले याची पोलीस कस्टडी हवी आहे. यासोबतच एक दुसरा मोबाईल जो सुदर्शन घुले याचा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्या मोबाईलचे लॉक अद्याप उघडलेले नाही आणि तेही उघडायचे आहे. त्याचा तपास करायचा आहे, असं किरण पाटील म्हणाले. दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

आणखी एका गँगवर मोक्का! 

दुसरीकडे,  बीड मधील गुन्हेगारांचे सिंडिकेट उध्वस्त करण्यासाठी आता पोलीस ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे सुदर्शन घुले गँगवर मकोकानुसार कारवाई केल्यानंतर आता महिनाभराच्या आतच आठवले गँगवर देखील अशाच पद्धतीने मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे आठवले गँगमधील सहा जणांचा यात समावेश आहे..अक्षय आठवले, सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर, प्रसाद धीवर, ओंकार सवाई या सहा आरोपीचा समावेश यामध्ये आहे.

नक्की वाचा - Chhava Movie : छावा सिनेमाला 'मराठी क्रांती मोर्चा'चा विरोध; तर संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "अजूनही वेळ गेली नाही"

यातील सनी आठवले आणि आशिष आठवले हे फरार आहेत..बीडमधील या आठवले  गँगवर गंभीर स्वरूपाचे 19  गुन्हे दाखल आहेत. संघटित गुन्हेगारीमध्ये. खूण , दरोडा, खुनाचा प्रयत्न, बलात्कार खंडणी,लुटमार, बनावट नोटा, मारहाण, असे गुन्हे असल्याने आता बीड पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे नको का अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार आता शी कारवाई करण्यात आली असून यापुढे देखील अशा पद्धतीने संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेतच यातून बीड पोलिसांनी दिले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com