Satara Crime : आरोपी तलवारीसह पोलीस ठाण्यात, चौकशीसाठी आलेल्या तरुणाने जीवन संपवलं; हैराण करणारं प्रकरण 

साताऱ्यातील शिरवळ येथे एका तरुणाच्या खून प्रकरणात चौकशीसाठी बोलावलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Satara Crime : साताऱ्यातील शिरवळ येथे एका तरुणाच्या खून प्रकरणात चौकशीसाठी बोलावलेल्या तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. 12 फेब्रुवारी रोजी साताऱ्यातील शिरवळ औद्योगिक वसाहतीमुळे अमर कोंढाळकर नावाच्या तरुणाची त्याचाच मित्र तेजस निगडे याने तलवारीच्या साहाय्याने वार करून हत्या केली होती. हत्या केल्यानंतर संशयित आरोपी तेजस निगडे हा स्वत:च पोलीस ठाण्यात तलवारीसह हजर झाला होता. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू होता. तपासाचा भाग म्हणून शिरवळ पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील न्हावी गावातील अजय शिंदे नावाच्या तरुणाला दोन दिवसांपूर्वी चौकशीसाठी बोलावलं होतं. यावेळी त्यांनी चौकशी करून अजयला सोडून दिलं होतं. 18 फेब्रुवारी रोजी त्याला शिरवळ पोलिसांनी फोन करून पुन्हा चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र त्याने घरातळ गळफास घेत आत्महत्या केली. अजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी किकवी रुग्णालात आणण्यात आला. यावेळी अजय शिंदेच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला. अजयने आत्महत्या का केली यामागील नेमकं कारण कळू शकलेलं नाही. मात्र चौकशीदरम्यान शिरवळ पोलिसांनी मारहाण केल्यामुळे अजयने गळफास घेत आत्महत्या केली असा आरोप अजय शिंदेच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. 

नक्की वाचा - मोबाइलमधील Voice Noteमुळे उकललं आत्महत्येचं गूढ; पुण्यातील सहितीसोबत नेमकं काय घडलं?

राजगड पोलिसांसकडून अजयच्या नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात सध्या वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू असून रात्री उशीरा अजय शिंदेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Topics mentioned in this article