
सुरज कसबे, प्रतिनिधी
Pune Crime : इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने ताथवडे परिसरातील राहत असलेल्या इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारून 5 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर या प्रकरणात नेमकी माहिती समोर आली नव्हती. कोणतीही सुसाइड नोट नसल्याने सहितीने टोकाचं पाऊल का उचललं याबाबतही काहीच माहिती मिळू शकली नव्हती. मात्र केवळ मोबाइलमधील एका व्हॉइस नोटमुळे या आत्महत्येचा खुलासा झाला आहे. सहितीचा मोबाइल लॉक होता, त्यात पासर्वड कुटुंबीयांना माहीत नव्हता. मात्र आत्महत्येपूर्वी तिने आपल्या मोबाइलचा पासवर्ड आणि एका तरुणाचा नंबर आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवला होता. त्यामुळे या प्रकरणातील गूढ समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुरुवातीला पोलिसांनी मृत सहिती रेड्डी ( 20 ) हिचा आस्कमिक मृत्यू झाल्याची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांनी मृत साहितीचे मित्र मैत्रीण तिच्या घरी आल्यावर त्यांनी कुटुंबीयांना महत्त्वाची माहिती दिली. सहितीने तिच्या मोबाइलचा पासवर्ड आणि सोसायटीमधील एका मित्राचा मोबाइल नंबर पाठवला असल्याचं कुटुंबीयांना सांगितलं. घरच्यांनी साहितीचा मोबाइल अनलॉक केल्यावर त्यात साहितीने तीन व्हॉईस मेसेज रेकॉर्ड करून ठेवले असल्याचं समोर आलं.
नक्की वाचा - Crime News : लग्नाची वरात पाहण्यासाठी गॅलरीत आला, अडीच वर्षांच्या लहानग्याचा हकनाक बळी
पहिला संदेश आई-वडील, दुसरा तिच्या मित्र मैत्रिणीसाठी आणि तिसरा संदेश हा तिचा मित्र प्रणव डोंगरे याच्यासाठी होता. यानुसार प्रणव आणि सहितीचे प्रेमसंबंध होते. याच प्रेमाचा गैरफायदा घेऊन प्रणव तिला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचं आता तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपी मित्र प्रणव राजेंद्र डोंगरे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world