जाहिरात

Satara News : लेकाच्या पहिल्या वाढदिवसाला येण्याच्या तयारीत; देशासाठी लढताना आलं वीरमरण; साताऱ्यावर शोककळा

जवान अर्जुन चव्हाण हे अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी सायली आणि अवघ्या 11 महिन्यांचा मुलगा सर्वेश, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.

Satara News : लेकाच्या पहिल्या वाढदिवसाला येण्याच्या तयारीत; देशासाठी लढताना आलं वीरमरण; साताऱ्यावर शोककळा

राहुल तपासे, प्रतिनिधी

Satara News : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या अपघाती स्फोटात कराड तालुक्यातील शहापूर येथील जवान अर्जुन राजेंद्र चव्हाण शहीद झाले आहेत. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

अर्जुन चव्हाण यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर शोककळा...

जवान अर्जुन चव्हाण हे अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी सायली आणि अवघ्या 11 महिन्यांचा मुलगा सर्वेश, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांचा धाकटा भाऊही भारतीय नौदलात देशसेवा बजावत आहे. अर्जुन चव्हाण यांचा मुलगा सर्वेश याचा पहिला वाढदिवस अवघ्या १५ दिवसांवर आला होता. त्या वाढदिवसासाठी ते सुट्टी घेऊन घरी येणार होते. मात्र, त्याआधीच देशाचं रक्षण करताना ते शहीद झाल्याच्या बातमीने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नक्की वाचा - Anti India Protest in US :भारताविषयी अपशब्द, तिरंग्याचा अवमान; अमेरिकेत भारताविरोधी घोषणाबाजी, धक्कादायक Video

शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी शहापूर गावात विशेष व्यवस्था करण्यात येत असून अंत्यसंस्कारासाठी एक स्वतंत्र ठिकाण निश्चित करण्यात आलं आहे. प्रशासकीय यंत्रणेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने तेथे जमले असून आपल्या वीरपुत्राच्या अंतिम दर्शनासाठी संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com