जाहिरात

Anti India Protest in US :भारताविषयी अपशब्द, तिरंग्याचा अवमान; अमेरिकेत भारताविरोधी घोषणाबाजी, धक्कादायक Video

अमेरिकेच्या टेक्सास राज्यातून एक व्हिडिओ समोर आला असून ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

Anti India Protest in US :भारताविषयी अपशब्द, तिरंग्याचा अवमान; अमेरिकेत भारताविरोधी घोषणाबाजी, धक्कादायक Video

Desecration of the Indian Flag in America : अमेरिकेच्या टेक्सास राज्यातून एक व्हिडिओ समोर आला असून ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये क्लेटन वॉकर नावाची व्यक्ती भारतीय राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करीत असल्याचं दिसत आहे. ही घटना फ्रिस्को सिटी हॉलच्या बाहेर घडल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतीय समाजातून मोठ्या संख्येने संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी ही भारत आणि भारतीयांचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. येथील स्थानिक भारताविरोधी घोषणा का करीत आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे. 


स्थलांतरितांविरोधात अमेरिकेतील नागरिकांचं आंदोलन...

मिळालेल्या माहितीनुसार, क्लेटन वॉकरने  उत्तरेकडील डलास भागात वाढणाऱ्या भारतीयांच्या स्थलांतरितांच्या विरोधात  आंदोलन पुकारलं आहे. यादरम्यान त्याने भारतीय ध्वजाचा अवमान करीत विरोध केला. या व्हिडिओमध्ये वॉकरच्या तोंडात सिगारेट दिसत आहे आणि तो तिरंग्याचा अवमान करीत असताना दिसत आहे. यादरम्यान उपस्थित लोक त्याचं समर्थन करीत असल्याचं दिसतंय. 

गर्दीमध्ये भारतविरोधी घोषणाबाजी...

व्हायरल व्हिडिओमध्ये, झेंड्याच्या अवमान करण्यात आला, याशिवाय गर्दीतील काहींनी भारत विरोधी घोषणाबाजी केली. तर काही लोक टाळ्या वाजवीत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्या संख्येने लोकांनी याचा विरोध दर्शविला. अनेकांनी म्हटलं की कोणत्याही देशाच्या ध्वजाचा अवमान करणं अभिव्यक्ती नसून द्वेष पसरवणं आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com