जाहिरात

Satara Politics: 'देव त्यांना सद्बुद्धी देवो...', रामराजे निंबाळकरांनी मंत्री गोरेंना डिवचलं, नेमकं काय म्हणाले?

त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय अडी निर्माण झाली आहे. माझा तोंडाला सध्या सेन्सरशिप लावली आहे ती योग्य वेळी उठवणार.." असा इशाराही रामराजे निंबाळकर यांनी दिला. 

Satara Politics: 'देव त्यांना सद्बुद्धी देवो...', रामराजे निंबाळकरांनी मंत्री गोरेंना डिवचलं, नेमकं काय म्हणाले?

राहुल तपासे, सातारा:

Ramraje Naik Nimbalkar On Jaykumar Gore: राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून माणचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे आणि रामराजे यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याचे सर्वश्रूत आहे. अशातच आता रामराजे नाईक निंबाळकर यांनी जयकुमार गोरेंना शुभेच्छा देत एका सल्लाही दिला आहे. जयकुमार गोरेंसोबत माझे वैयक्तीक भांडण नाही, त्यांनी गोरगरिबांसाठी काम करावे, असं ते म्हणालेत. फलटण येथील कोळकी या ठिकाणी एका विकास कामाचा शुभारंभ आणि लोकार्पण कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

'मराठी'वरुन बरळणाऱ्या दुबेंना महिला खासदारांनी हिसका दाखवला! संसदेच्या लॉबीत घेरलं, नेमकं काय घडलं?

काय म्हणाले रामराजे निंबाळकर?

"हे दहशतीचे दिवस आहेत. पोलीस काय करतात हेही माहित आहे. कोणाला कसे अडवले जाते हेही माहित आहे. काही दिवसापूर्वी जो खून झाला तो कोणी केला हे मला माहित आहे मी आत्ता बोलणार नाही. यांना वाय (Y) सिक्युरिटी (कपाळावर हात मारून) धमक्या मला येतात. मी आपला फिरतो आणि सिक्युरिटी यांना असा टोलाही त्यांनी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता  रामराजे नाईक निंबाळकर यांनी लगावला. 

"जयकुमार गोरे आणि माझी काही वैयक्तिक भांडण नाहीत. जयकुमार गोरे यांच्या मनात जे आहे ते सगळे मीच करतो. देवाने त्यांना सद्बुद्धी देवो, त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी मंत्री व्हावे संत्री व्हावे फक्त गरिबांसाठी काम करा सत्तेचा वापर चांगला करा. माझं वय झाले आहे माझा जयकुमार गोरेंना चांगले सांगणे आहे हा माझा अधिकारच आहे. त्यावेळी काय फासे पडले हे माहित नाही. त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय अडी निर्माण झाली आहे. माझा तोंडाला सध्या सेन्सरशिप लावली आहे ती योग्य वेळी उठवणार.." असा इशाराही रामराजे निंबाळकर यांनी दिला. 

Prahar Protest: शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा प्रहार! राज्यभर 'चक्का जाम' आंदोलन

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com