जाहिरात

कोल्हापूर काँग्रेसमध्ये मोठी कोलाहल; मधुरिमा राजे यांची माघार, सतेज पाटील यांचा संताप

काँग्रेस नेत्याने अपक्ष उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात (Kolhapur North Assembly Constituency) मोठी घडामोड सुरू आहे.

कोल्हापूर काँग्रेसमध्ये मोठी कोलाहल; मधुरिमा राजे यांची माघार, सतेज पाटील यांचा संताप
कोल्हापूर:

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये (Kolhapur North Assembly Constituency)  आज जबरदस्त ड्रामा पाहायला मिळाला. या मतदारसंघातून काँग्रेसतर्फे मधुरिमा राजे (Madhurima Raje) यांना उमेदवारी देण्यात आली होती. 4 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारखी होती. सोमवारी मधुरिमा राजे यांनी आपला अर्ज मागे घेतला. यामुळे या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अस्तित्वच संकटात आले आहे.  मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील हे जबरदस्त संतापले आहेत. 

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात मधुरिमा राजे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या मतदारसंघात काँग्रेसच्या राजेश लाटकर यांनी बंडखोरी केली होती. लाटकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी सतेज पाटील प्रयत्न करत होते. मात्र घडलं भलतंच राजेश लाटकर यांचा अर्ज कायम राहीला आणि काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी आपला अर्ज मागे घेतला. मधुरिमा राजे या माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या सूनबाई आहेत.

मधुरिमा राजे यांना उमेदवारी दिल्यानंतर राजेश लाटकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. यावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनीही मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते निवडणूक लढवण्यावर ठाम होते. त्यात राजेश लाटकर आज सकाळपासून नॉटरिचेबल होते. मुदत संपण्यापूर्वी लाटकर अर्ज मागे घेतील अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत लाटकर अर्ज मागे घेण्यासाठी आले नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणी मधुरिमा राजे यांनी अर्ज मागे घेतला. 

कोणी घेतली माघार तर कोणत्या उमेदवारांची बंडखोरी कायम? जाणून घ्या एका क्लिकवर

नक्की वाचा - कोणी घेतली माघार तर कोणत्या उमेदवारांची बंडखोरी कायम? जाणून घ्या एका क्लिकवर

सतेज पाटील संतापले...
छत्रपती घराण्याच्या निर्णयानंतर सतेज पाटलांना राग अनावर झाला आहे. मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्यामुळे कोल्हापूरच राजकारण बदललं आहे. छत्रपती घराण्याच्या निर्णयामुळे सतेज पाटलांना राग अनावर झाला आहे. उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर ते कार्यकर्त्यांवर चिडले. काँग्रेसच्या उमेदवारानं माघार घेतल्यामुळे मविआकडे आता अधिकृत उमेदवार नसेल. या माघारीनंतर सतेज पाटलांनी संताप व्यक्त केला. ही माझी फसवणूक असल्याचं ते यावेळी म्हणत होते. मधुरिमा राजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे सतेज पाटील नाराज आहेत. त्यामुळे शाहू महाराज आणि सतेज पाटील यांच्यात वाद निर्माण झाला आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.