
Students Scholarship News : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हुशार शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. अनेक वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या संच संख्येत कोणतीही वाढ किंवा बदल करण्यात आलेला नाही. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ पोहचविण्यासाठी शिष्यवृत्तीच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मंत्रालयात विविध शिष्यवृत्तींबाबत व शिष्यवृत्ती योजनांच्या लाभार्थी संख्येत वाढ करण्याबाबत आढावा बैठक झाली. यावेळी झालेल्या बैठकीमध्ये भुसे यांनी ही सूचना दिसी. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल, उपसचिव समीर सावंत, शिक्षण संचालनालयाचे (योजना) संचालक महेश पालकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
( नक्की वाचा : Amrit Stations : राज्याला मिळणार 15 अमृत स्टेशन, PM मोदी करणार उद्घाटन )
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यावेळी म्हणाले, सध्या इयत्ता 5 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 थीमध्ये आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7 वीमध्ये घेण्यात याव्यात. या बदलामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकेल व त्यांचे पुढील शिक्षण सुलभ होईल. पुढील शिक्षण घेण्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. या कामाला गती देण्यात यावी. येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल.
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन व विविध प्रकारची मदत दिली जाते. इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती-जमाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनाही अशीच मदत करण्याबाबत प्रस्ताव संबंधित विभागाने सादर करावा, असेही भुसे यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world