जाहिरात

Eknath Shinde: नाराजी नाट्यानंतर शिंदे गटाचं 'ऑपरेशन आत्मविश्वास'; दादा भुसेंनी थेटच सांगितलं 'आगामी CM कोण?

Dada Bhuse Declares Eknath Shinde as the Next Chief Minister : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

Eknath Shinde: नाराजी नाट्यानंतर शिंदे गटाचं 'ऑपरेशन आत्मविश्वास'; दादा भुसेंनी थेटच सांगितलं 'आगामी CM कोण?
नंदुरबार:

प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी

Dada Bhuse Declares Eknath Shinde as the Next Chief Minister: राज्यात सध्या नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चाही जोरात आहे. या सर्व गदारोळात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. येणाऱ्या काळात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते नंदुरबारमध्ये बोलत होते.  भुसे यांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री

मंत्री भुसे यांनी स्पष्टपणे सांगितले की, "आजही जनतेला विचारले तर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण आहे? तर जनता एकनाथ शिंदे यांचेच नाव घेईल." ते पुढे म्हणाले की, जनतेने यापूर्वी असा मुख्यमंत्री कधीही पाहिला नव्हता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला सामान्य माणूस मुख्यमंत्र्यांना भेटल्याशिवाय माघारी जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील प्रत्येक माणसाला भेटल्याशिवाय झोपत नाहीत, अशी त्यांची कार्यशैली आहे.

( नक्की वाचा : Maharashtra Local Body Elections: 246 नगर परिषदा, 42 नगर पंचायतींसाठी मतदान 2 डिसेंबरला; वाचा A to Z माहिती )
 

दादा भुसे यावेळी म्हणाले की, '' कोणीही काळजी करू नये. भविष्याच्या इतिहासामध्ये काय लिहिलेले असेल? परत या महाराष्ट्राचे नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करताना आपण सर्वजण त्या ठिकाणी पाहणार आहोत." मुख्यमंत्री शिंदे यांचे काम किती जलद आहे, हे सांगताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचाही उल्लेख केला. अजित पवार साहेब प्रत्येक सभेत सांगतात की, "महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या सह्या करणारा मुख्यमंत्री मी कधी पाहिला नाही." याचाच अर्थ मुख्यमंत्री शिंदे हे सामान्य माणसाच्या कामांना प्राधान्य देत, जलद निर्णय घेत आहेत.

आगामी काळात नंदुरबार नगरपालिकेवर शिवसेनाच आपला भगवा झेंडा फडकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, स्थानिक नेत्यांना त्यांनी आश्वासन दिले की, नंदुरबार शहराच्या विकासासाठी कोणत्याही निधीची काळजी करण्याची गरज नाही. कारण, विकास विभाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने, या शहराच्या विकासासाठी 'जीवन निधी' (आवश्यक निधी) निश्चितपणे उपलब्ध होईल, असे ते म्हणाले. यासोबतच, "आपल्या विरोधात असलेले नेतेही आता आपल्या सोबत आहेत," असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com