
भुपेंद्र अंबवणे
मुंबई आणि ठाण्यापासून जवळ असणारा शहापूर हा तालुका. पण विकासापासून हा तालुका अजूनही कोसो मैल दुर आहे. अनेक वाड्यावस्त्यांपर्यंत रस्ते नाहीत. रस्ते सोडा पाऊल वाटाही नाहीत इतकी विदारक स्थिती आहे. शिवाय आरोग्य व्यवस्थेच्या नावाने बोंब आहे. सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसात समोर आल्या त्या याच तालुक्यातून. आता तर एक अंगावर काटा आणणारी घटना याच तालुक्यात घडली आहे. प्रसूती वेदना होत असलेल्या तरूणीला दवाखान्या जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. शेवटी कशीबशी ती रुग्णालयात पोहोचली पण तिथेही तिला योग्य उपचार मिळू शकले नाहीत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही घटना शहापूर तालुक्यातल्या चाफेवाडी इथं घडली. नडगाव ग्रामपंचायती अंतर्गत चाफेवाडी येते. पण या वाडीपर्यंत जाण्यासाठी धड पायवाटही नाही. त्यात पाऊस. याच चाफेवाडीत संगीता मुकणे ही विवाहीता राहाते. ती 21 वर्षांची आहे. ती गर्भवती होती. तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे तिला दवाखान्यात नेणे गरजेचे होते. रुग्णवाहीका घरापर्यंत येवू शकत नाही अशी स्थिती. त्यामुळे जीथे रुग्णवाहीका येते तिथे तिला झोळीतून घेवून जाण्या शिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे वाडीतल्या लोकांनी झोळी केली आणि त्यात संगीताला टाकले.
पायवाटेने चिखल तुडवत जवळपास दोन किलोमिटरचा रस्ता कापत गावकरी रुग्णवाहीके जवळ पोहोचले. त्यानंतर रुग्णावाहीकेतून संगीताला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं. पण त्या दवाखान्यातही तिला योग्य उपचार मिळू शकले नाही. त्याच वेळी तिला आकडी ही आली. त्यावर उपचार रुग्णालयात उपलब्ध नव्हते. त्यामुळे तिला ठाण्याला नेण्याच्या सुचना संबधित डॉक्टरांनी केल्या. त्यानंतर त्या महिलेला तातडीने ठाण्याच्या सिव्हिली रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
शहापूरमध्ये अजूनही आरोग्याच्या चांगल्या सुविधा नाहीत. एकीकडे मुंबई आणि ठाण्यासारखी शहरे विकसीत होत आहे. तिथे सर्व सोयी सुविधाही मिळत आहेत. पण या दोन्ही शहरांपासून जवळ असलेल्या शहापूरमध्ये प्राथमिक गरजा पुर्ण करणाऱ्याही आरोग्याच्या सुविधा नाहीत असा आरोप स्थानिक करत आहे. सरकारी रुग्णालये आहेत पण त्यात सुविधा आहेत का असा ही प्रश्न निर्माण होत आहे. आदिवासी वाड्यांपर्यंत अजूनही रस्ते नाहीत. असा वेळी अनेकांच्या जीवावरही बेतले आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world