
Shani Shingnapur News : शनिशिंगणापूर हे महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. देशभरातील भाविक शनिदेवाची पूजा करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे येत असतात. मात्र तुम्ही जर या आठवड्यात शनिशिंगणापूरला येणार असाल तर तुम्हाला चौथऱ्यावर जाऊन तेलअभिषेक करता येणार नाही.
येत्या शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी दर्श पिठोरी अमावस्या, शनिअमावस्या आहे. या दिवशी पितरांचे स्मरण केले जाते आणि शनिदेवाची पूजा केली जाते. या दिवशी दान करण्याची परंपरा आहे. शुक्रवारी शनिशिंगणापूर येथे मोठी यात्रा भरते. त्यावेळी भक्तांची गर्दी लक्षात घेता शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी सायंकाळपर्यंत शनिशिंगणापूर मंदिरातील चौथऱ्यावरुन शनिदेवाला तेलअभिषेक दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवार आणि शनिवारी वाढती गर्दी लक्षात घेता शनिशिंगणापूर देवस्थानाने हा निर्णय घेतला आहे.
नक्की वाचा - Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार घरात कोणतं चित्र लावालं? 5 चित्र अन् त्यांचे आश्चर्यजनक फायदे
शुक्रवारी (22 ऑगस्ट) सकाळी 11.55 वाजेपासून ते शनिवारी (23 ऑगस्ट) सकाळी 11.35 वाजेपर्यंत शनिअमावस्या असेल. या काळात शनिदेवाची पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक शिंगणापुरात येत असतात. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री महाआरतीपूर्वी ते शनिवार सायंकाळी महाआरती पूर्ण होईपर्यंत चौथऱ्यावर चढून तेल अभिषेक करण्यास बंदी असेल.
शनिअमावस्या काय आहे?
हिंदू मान्यनेनुसार श्रावणातील महत्त्वाचा आणखी एक सण म्हणजे दर्श पिठोरी अमावस्या. या दिवशी पितरांचे पूजन आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. याला काही ठिकाणी शनिअमावस्याही म्हटलं जातं. या दिवशी शनिशिंगणापूर येथे मोठी यात्रा भरते. यावेळी होणारी गर्दी लक्षात घेता शनिशिंगणापूर देवस्थानाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world